महाराष्ट्र मुंबई

शिवसेना-भाजप युती होणार? संजय राऊतांनी दिले संकेत

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीच्या युतीची रणनिती आणि समीकरणं जुळत आहेत, असे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. शिवसेनेच्या खासदार आणि महत्वाच्या नेत्यांची ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

निवडणुकीची रणनिती आणि समीकरणं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवत आहेत, असं म्हणत त्यांनी युतीचे संकेतच दिले आहेत. या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

या बैठकीत जनता दल युनायटेडचे नेते आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर भाजपकडून मध्यस्थीसाठी आले होते.

प्रशांत किशोर हे घटकपक्षातील महत्वाचे सदस्य आहेत. त्यांची ही केवळ सदिच्छा भेट होती, असंही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-दोन पैलवान एकत्र भेटले, शिवसेनेच्या आढळरावांना ‘आस्मान’ दाखवणार??

मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांच्यात बंद दाराआड चर्चा, अण्णा उपोषण सोडणार?

-चक्क ‘राज्यपालां’वर फेकले कागदाचे बोळे; एक आमदार बेशुद्ध

-‘या’ बंधूंना विक्रमाची संधी! प्रथमच एकत्र खेळणार आंतरराष्ट्रीय सामना?

लोकसभेच्या तिकीटासाठी कायपण! काँग्रेस नेता राहुल गांधींच्या पाठीमागे थेट दुबईपर्यंत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या