“संताप ओळखा नाहीतर आज फास लावून घेणारा शेतकरी उद्या सरकारला फास लावेल”

उद्धव ठाकरे

मुंबई | सरकारने शेतकऱ्यांचा असंतोष ओळखावा नाहीतर आज फास लावून घेणारा शेतकरी उदया सरकारलाही फास लावू शकतो, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारला दिला आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये महाराष्ट्रासारखं राज्य देशात पहिला क्रमांकावर असणे लांच्छनास्पद आहे, असही त्यांनी सामना संपादकीयातून म्हटलं आहे.

गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात 11 हजारांपेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. यावरून शिवसेनेने भाजपला फटकारले आहे.

दरम्यान, मराठवाड्यात गेल्या 11 महिन्यांत 855 तर विदर्भात 743 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

-भाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं?

-मी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार

-…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला? – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

-श्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल

-कोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस