Top News मनोरंजन

शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात!

नवी दिल्ली | ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारावर भाष्य करणं कंगणा राणावतला महागात पडलंय. शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सहा मोठ्या ब्रॅण्ड्सनी कंगणासोबतचे आपले करार रद्द केले आहेत. याविषयी कंगणाने ट्वीट करुन माहिती दिली आहे.

तुम्ही शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्यामुळे आम्ही तुम्हाला आता ब्रॅण्ड अॅम्बेसिडर करु शकत नाही. पण आता मी या राष्ट्रद्रोही ब्रॅण्ड्सना आणि या हिंसाचाराचं समर्थन करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला सांगू इच्छिते की, दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचे जे समर्थन करताहेत, ते सुद्धा दहशतवादी आहेत, असं कंगणा म्हणालीये.

दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर वक्तव्य करताना कंगणाने शेतकऱ्यांना दहशतवादी आणि खलिस्तानी संबोधलं होतं. नेटिझन्सकडून तिच्यावर टीकेचा भडिमार करण्यात आला.

दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर कंगणाने या आधीही टीका केली होती.

थोडक्यात बातम्या- 

‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी

‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप

कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय!

सातवीतील मुलीचे शिक्षकासोबत पलायन; चिठ्ठीत लिहिलं धक्कादायक कारण

“बेळगाव सोडा, मुंबईही आमचाच भाग आहे”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या