Maharashtra Assembly Election l राज्यातील विधानसभेचा निकाल जाहीर झाला असून महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. यावेळी महायुतीने 288 पैकी तब्बल 230 जागांवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यासोबतच अपक्ष व इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार आहे. मात्र अशातच आता विधानसभेत डावललेल्या नाराजांना महायुती विधान परिषदेवर संधी देणार असल्याची माहिती मिळाली आहे.
विधानपरिषदेच्या 6 जागा रिक्त :
यावेळी विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनेक दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. यामध्ये विधानपरिषदेवर आमदार असलेल्या काही नेत्यांच्या नावांचा देखील समावेश होता. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानपरिषदेवर असलेल्या आमदारांचा देखील विजय झाला आहे. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या 6 जागा पुन्हा रिक्त झाल्या आहेत.
विधानपरिषदेच्या एकूण 6 जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे विधानपरिषदेतील भाजपच्या 4 आमदारांची विधानसभेवर वर्णी लागली आहे. यामध्ये सध्या चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. तर हे 4 नेते विधानसभेवर निवडून देखील गेले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत भाजपच्या या 4 जागा रिक्त झाल्या आहेत.
Maharashtra Assembly Election l कोणाला संधी मिळणार? :
याशिवाय दुसरीकडे शिवसेनेकडून आमश्या पाडवी यांची देखील विधानसभेवर निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेनेची एक जागा विधानपरिषदेत रिक्त झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या एका नाराजाला शांत करण्याची एकनाथ शिंदे यांना संधी मिळाली आहे.
यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेश विटेकर हे देखील विधानपरिषदेवर आमदार आहेत. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे त्यांची विधानपरिषदेची जागा पुन्हा रिक्त झाली आहे. यानुसार आता महायुतीच्या विधानपरिषदेच्या एकूण 6 जागा रिक्त झाल्या असल्याने या ठिकाणी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
News Title –six seats will vacant of vidhan parishad mahayuti
महत्त्वाच्या बातम्या-
संभाव्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; कोणाला किती मिळणार मंत्रिपदं
निकालानंतर EVM विरोधात याचिका कोण दाखल करणार?
जरांगे फॅक्टरचा फायदा कुणाला?, सर्वाधिक मराठा आमदार कोणत्या पक्षाचे आले?
“त्या गरजा माझ्या खूपच कमी झाल्या आहेत”, प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा