बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दररोज सामन्यापुर्वी…’; सिक्सर किंग युवराजने दिला भारतीय संघाला मोलाचा सल्ला

मुंबई | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्युझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. त्याआधी सरावासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 18 जून ते 22 जून दरम्यान हा सामना खेळला जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघ सध्या विलगिकरणात आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंडसोबत कसोटी सामना खेळत आहे. कसोटी सामनांपैकी हा सर्वात महत्वाचा सामना असल्यानं माजी क्रिकेटपटू आणि सिक्सर किंग युवराज सिंग याने भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे.

विराट कोहलीचा भारताचा संघ सध्या नुकसानाच्या परिस्थितीत आहे. कारण, भारतीय संघ या महत्त्वपूर्ण सामन्यात मर्यादित तयारी करून उतरेल. संघ या सामन्यापूर्वी 8 ते 10  सराव सत्रे घेईल. परंतु, एका सराव सामन्याची कमी त्यातून भरून निघणार नाही. या तुलनेत न्यूझीलंड संघ या ठिकाणी बऱ्याच कालावधीपासून आहे. तसेच ते इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका देखील खेळत आहेत. याचा त्यांना फायदा होईल, असं युवराज सिंग म्हणाला.

भारताचे सलामीवीर कसे कामगिरी करतात यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल. रोहित आता एक अनुभवी फलंदाज बनला आहे तर, शुबमन गिलकडे प्रतिभा आहे. केवळ या दोघांना इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात सलामी करण्याचा अनुभव नाही. रोहितने 7 कसोटी शतके झळकावली असून, त्याच्यावरील जबाबदारी आता आणखीन वाढली आहे. त्यामुळे दररोज सामन्यापुर्वी खेळपट्टीचा आढावा घेण्याची गरज असल्याचं युवराजने सांगितलं.

दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना हा दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. या सामन्यात जो संघ बाजी मारेल तो कसोटी सामन्याचा बादशहा होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे संपुर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल, या सामन्यात भारतीय संघातील फलंदाजांवर जास्त भार असणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“ट्विटर मोदींच्या राजकीय प्रचाराचा आत्मा होता, पण आता…”

“नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोललं की, लोक चंपा म्हणतात”

भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला- संजय राऊत

“बर्गर, पिझ्झा, स्मार्टफोनची होम डिलिव्हिरी होऊ शकते, तर मग राशनची का नाही?”

“महाराष्ट्राला दीड कोटी लस देणार असल्यानं केंद्राची पुनावालांना तंबी, म्हणून ते लंडनला गेले”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More