बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Skin care Tips: कोरडी त्वचा असेल तर करा ‘या’ गोष्टींचा वापर, लगेच जाणवेल फायदा

दिल्ली | नैसर्गिक ऋतूत त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. काही घरगुती उपायही अवलंबवावे लागत असतात. त्वचेची निगा राखण्यासाठी कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर त्वचेला पुरेसा नसतो. तर तुम्हाला काही प्रभावी घटकांचा वापर करावा लागतो.

थंडीच्या वातावरणात थंडीमुळे त्वचेची आद्रता कमी होते. यामुळे ऋतूत काळजी घेणे गरजेचं असतं. हिवाळ्यात त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी दुधाची साय खूप फायदेशीर ठरते. दुधातून तयार होणारी साय कोरड्या त्वचेसाठी फारच प्रभावी ठरते. तसेच साय त्वचेवर नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. साय त्वचेवर लावल्यानं कोरडेपणा दूर होतो, रंग सुधारतो व त्वचेच्या अनेक समस्यांवर उपाय होतात. चेहऱ्यावर क्रीम वापरून वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी करता येतात. जाणून घेऊया त्वचेसाठी दुधातील साय वापरण्याचे फायदे कोणते आहेत.

सकाळी आणि संध्याकाळी त्वचेला साय लावून मसाज केल्याने त्वचा चमकदार, मुलायम आणि गुळगुळीत होते. मसाजिंग केल्याने त्वचेच्या मृत पेशी निघून जातात आणि त्वचा तरुण आणि सुंदर दिसते. साय लावल्यानं त्वचेची छिद्रे खोलवर साफ होतात. तसेच नियमित वापर केल्यानं त्वचेवर साचलेली घाण साफ होऊन त्वचा चमकदार दिसते.

दुधातील साय स्क्रब म्हणूनही वापरू शकतो. सायमध्ये एक चमचा रस मिसळा आणि त्वचेवर 15 मिनिटे लावा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा मग टॅनिग दूर होईल. साय आणि लिंबाचं मिश्रण स्कीनवर हळुवार लावा, नंतर त्यांना सुकू द्या मग थंड पाण्याने चेहरा धुवा. याचा नियमित वापर केल्याने डार्क स्पॉट्स दूर होतात. आणि कोरड्या त्वचेची समस्याही कमी होते.

थोडक्यात बातम्या – 

भिडे पूल होणार इतिहासजमा, पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

महेश मांजरेकर यांनी लेकीच्या अभिनयाविषयी सांगितली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

बाॅलिवूडला मोठा धक्का! सदाबहार अभिनेते रमेश देव यांचं निधन

स्मार्टफोनमध्ये डॉक्युमेंटवर डिजिटल स्वाक्षरी कशी कराल?; वाचा संपूर्ण प्रकिया

Breaking| 10 वी 12 वीच्या परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More