मुंबई | बदलत्या ऋतूत तब्येतीसोबतच त्वचेची काळजी घेणं देखील खूप गरजेचं आहे. त्वचेची निगा राखण्यासाठी महागड्या कॉस्मेटिक उत्पादनांच्या वापरापेक्षा काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. या पावसाळ्यात काही सोपे घरगुती उपाय करून तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता.
पावसाळ्यात अपल्या चेहऱ्यावरचा तेलकटपण निघून जातो आणि आपली त्वचा ड्राय पडते. त्यामुळे दिवसातून किमान 7 ते 8 वेळा पाणी प्या. त्यामुळे तुमचा त्वचेवरील ड्रायनेस कमी होतो आणि चेहरा ग्लोविंग दिसतो.
पावसाळ्यात पालेभाज्यांचा ज्यूस देखील त्वेचेसाठी फायद्याचा ठरतो. पालेभाज्यांच्या ज्यूसमुळे शरीर हायड्रेट होतं. तसेच बीट,गाजर ,काकडीपासून बनवलेले ज्यूस नक्की प्या. तसेच या ऋतुत दही, चिंच ,व्हिनेगर यांसारख्या गोष्टींचं सेवन टाळावं. अन्यथा तुमच्या त्वचेवर मुरूम, खाज इत्यादी गोष्टी उद्भवू शकतात.
पावसाळ्यात हळद, कोरफड, चंदन यासारख्या गोष्टींचा वापर करा. पावसाळ्यात त्वचा ओली असल्यामुळे संसर्ग होण्याचं प्रमाण जास्तं असतं. त्यामुळे कडुलिंब आणि हळद यासारख्या तेलाने मालिश करून घ्यावी. त्यामुळे त्वचा संक्रमणापासून मुक्त होण्याची शक्यता असते.
थोडक्यात बातम्या-
‘शरद पवार म्हणजे काही…’, केतकी चितळे स्पष्टच बोलली
‘एखाद्या सांगाड्यासारखं हे सरकार भाजपच्या रुग्णवाहिकेतून अवतरलं आहे’, शिवसेनेचा घणाघात
‘हिंमत असेल तर…’, उद्धव ठाकरेंचं शिंदे सरकारला आव्हान
तुमच्याकडे असणाऱ्या ‘या’ नोटा बाद होणार, RBI चा मोठा निर्णय
‘…तरीही माझ्यातला शिवसैनिक जिवंत असेल’, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
Comments are closed.