सुंदर त्वचेसाठी सकाळी उठल्यावर ‘ही’ 4 कामे करा; मिळतील फायदेच फायदे

Skin Care Tips | प्रत्येक व्यक्तीला विशेषत: मुलींना सुंदर आणि चमकदार त्वचेबद्दल नेहमीच आकर्षण असते.आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार असावी यासाठी अनेक महागडे प्रोडक्टस वापरले जातात. मात्र, सुंदर त्वचेसाठी फक्त महागड्या क्रीम वापरुन काही होत नाही. व्यक्तीचा आहार,व्यायाम तसंच काही नियम पाळले तर त्याचा परिणाम दिसून येतो.

या लेखात तुम्हाला सुंदर त्वचेचं रहस्य सांगणार आहोत. या लेखात काही टिप्स सांगितल्या आहेत. या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच आश्चर्यकारक फायदे दिसून येतील. तुम्हाला प्रत्येक जण तुमच्या सुंदरतेचंय रहस्य विचारेल. चला तर मग जाणून घेऊयात, सुंदर त्वचेसाठीच्या टिप्स.

सकाळी उठल्यावर करा ‘ही’ 4 कामे

पहिलं काम :  तुमची त्वचा सुंदर आणि मुलायम बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही स्टीम घ्या. असे केल्याने केवळ छिद्रेच उघडत नाहीत तर त्वचेची खोल साफसफाईही होते. यासाठी प्रथम एका भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात गुलाबाच्या पाकळ्या घाला. यामध्ये (Skin Care Tips)स्वच्छ कपडा ओला करून तो चेहऱ्यावर ठेवा किंवा त्या कपड्याने आपला चेहरा चांगला साफ करून घ्या. यामुळे त्वचेवरील सर्व घाण निघून जाईल.

दुसरं काम : स्टीम घेतल्यानंतर, दुसरं काम म्हणजे मालिश. स्टीम घेतल्यायानंतर त्वचेला 5 मिनिटे चांगले मसाज करा. असे केल्याने रक्ताभिसरण वाढू शकते. मसाजसाठी तुम्ही खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल वापरू शकता.

तिसरं काम : स्टीम आणि मसाज केल्यानंतर त्वचा स्वच्छ धुवून काढा. यासाठी तुम्ही चांगला फेसवॉश वापरू शकता. चेहरा स्वच्छ धुवून काढल्यानंतर त्याला स्क्रब करा. हलक्या हाताने स्क्रब केल्याने मृत त्वचा निघून जाईल.

चौथे काम : शेवटचा टप्पा म्हणजे (Skin Care Tips) मॉइश्चराइजर लावणे. मॉइश्चराइजर लावल्याने त्वचा मुलायम होते. मॉइश्चराइजर लावल्यानंतर हलक्या हाताने दोन मिनिटे मसाज करा. या टिप्स तुम्ही रोज फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा दिसून येईल.

News Title : Skin Care Tips

महत्त्वाच्या बातम्या –

पुढील 48 तासांत ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

बॉयफ्रेंड मिळताच पत्नीने काढला पतीचा काटा, धक्कादायक प्रकार बघून पोलिसही झाले शॉक

महाराष्ट्र हादरला! भररस्त्यात लोखंडी पान्याने वार करत त्याने गर्लफ्रेंडला संपवलं, लोक बघत राहिले

राजकारण तापणार! शिंदे गटाच्या नेत्याचा प्रणिती शिंदेंवर गंभीर आरोप

“ही घराणेशाही नाही, शरद पवार आणि अजित पवारांचं कुटुंब वेगवेगळं”