Skincare | आहारात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतील तर तुमचे शरीर निरोगी राहिल. आपण जे काही खातो त्याचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरच नाही तर त्वचेवरही होतो. जसजसे वय वाढते, तसतसे शरीरासोबतच त्वचेतही बदल होऊ लागतात. वयाच्या 40 व्या वर्षी त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात. अशा परिस्थितीत काही लोक तणावग्रस्त होतात. (Skincare)
काय सांगतात तज्ज्ञ?
त्वचा तरुण ठेवण्यासाठी तुम्हाला केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही तिची काळजी घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत, ज्याचे पालन करून तुम्ही त्वचा तरुण ठेवू शकता.
अशी करा दिवसाची सुरुवात
तुमच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्याने करा. त्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. पाणी प्यायल्यानंतर तुम्ही बदाम आणि अक्रोड खा. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल तसेच त्वचाही चमकेल.
नाश्त्यात प्रथिनेयुक्त पदार्थ
तज्ज्ञ म्हणतात की नाश्त्यात प्रथिनेयुक्त पदार्थ खा. प्रथिने त्वचा तरुण ठेवण्यास मदत करतात. तुम्ही सकाळी डाळीचे धिरडे बनवू शकता. यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि ते त्वचेसाठी फायदेशीर ठरेल. (Skincare)
पुरेशी झोप घ्या
झोपेच्या कमतरतेमुळेही चेहरा निस्तेज दिसतो. अशा परिस्थितीत दररोज 7 ते 8 तासांची झोप घ्या. जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेता तेव्हा शरीर त्याच्या पेशींची पुनर्निर्मिती करते. हे त्वचा तरुण ठेवण्यास मदत करते.
ग्रीन टी प्या
ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करतात. यामुळे त्वचेत घट्टपणा येतो आणि चमकही येते. ग्रीन टी पिल्याने वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत होते.
तणाव टाळा
तज्ज्ञ म्हणतात की कोणत्याही परिस्थितीत तणाव घेऊ नका. यामुळे त्वचेत निस्तेजपणा येतो. तुम्ही योगासने आणि ध्यानधारणा करा, जे तुम्हाला तणावापासून वाचवतील. (Skincare)
Title: Skincare Follow These Tips to Keep Skin Young Even After 40