बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसुख हिरेन यांचा सचिन वाझेंच्या गाडीत बसतानाचा व्हिडीओ आला समोर, पाहा व्हिडीओ

मुंबई | गेल्या काही दिवसांपुर्वी देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी आढळून आली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांना तपासासाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र काही दिवसांनंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांच्याकडेे होता. मात्र सचिन वाझेंनीच मनसुख यांची हत्या करण्यात आल्याचा संशय महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने व्यक्त केला आहे.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळ्यावर यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी आपला जबाबात, सचिन वाझे यांनीच संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी घेऊन स्वतःला अटक करून घे मी तुला बाहेर काढतो सर्व प्रकरण माझ्याकडेच आहे, असं सांगितलं होतं. अशातच सचिन वाझे यांच्या प्रकरणात नवीन व्हिडीओ समोर आला आहे. News18 ने याबाबत वृत्त दिलं आहे.

सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये मनसुख हिरेन हे निलंबित अधिकारी आणि  एनआयएच्या ताब्यात असलेले सचिन वाझे यांच्या गाडीमध्ये बसताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. वालचंद हिराचंद मार्ग परिसरातला हा सीसीटीव्ही असून एका रस्त्यावरील सिग्नलवर सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन वाझेंच्या मसिर्डीज कारमध्ये बसल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

दरम्यान, सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे त्याची तारीख 17 मार्च आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

रश्मी शुक्लांनी भाजपमध्ये राहण्यासाठी ‘या’ आमदारावर आणला दबाव; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

विमाधारकांसाठी आनंदाची बातमी; अटी पूर्ण होत नसतील तर ‘या’ कालावधीत करू शकता पॉलिसी रद्द

अकोल्यात चक्क बकऱ्यांची बँक! ‘गोट बँक ऑफ कारखेडा’ या बँकेचं काम जाणून घ्या तूम्हीही व्हाल थक्क

बाबो! शनया कपूरच्या बिकनीची किंमत आहे इतकी, जाणून घ्या

“आजपासून मी आरएसएसला ‘संघ परिवार’ म्हणणार नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More