Skoda Car | स्कोडा कार चालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया (Volkswagen Tigua) कंपनीने त्यांच्या काही लोकप्रिय मॉडेल्समध्ये सीटबेल्टमध्ये गंभीर दोष आढळल्याने तब्बल 47,235 गाड्या परत मागवल्या आहेत. या कारमध्ये मागील सीटबेल्टमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
कंपनीने स्पष्ट केलं आहे की, ही कार 24 मे 2024 ते 1 एप्रिल 2025 या कालावधीत उत्पादित करण्यात आली होती. त्यामुळे या कालावधीत तयार झालेल्या स्कोडा व फोक्सवॅगनच्या काही विशिष्ट मॉडेल्सचे मालक सतर्क राहावेत.
कोणत्या मॉडेल्सवर परिणाम? :
Volkswagen Tiguan आणि Virtus – 21,513 युनिट्स
Skoda Kushaq, Slavia आणि Kodiaq – 25,722 युनिट्स
या गाड्यांच्या मागील सीटबेल्ट बकल लॅच प्लेट तुटू शकते, किंवा वेबिंग आणि बकल निकामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो.
Skoda Car | कंपनी काय करणार? :
स्कोडा कंपनीने सांगितले की, ग्राहकांसाठी सुरक्षितता हा सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. त्यामुळे संबंधित गाड्या परत मागवून त्यात नव्या प्रकारचा सीटबेल्ट बसवण्यात येणार आहे. (Skoda Car)
कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये हे काम विनामूल्य केले जाणार आहे. ग्राहकांनी आपल्या गाडीची चेसिस नंबर तपासून लवकरात लवकर नजीकच्या सर्व्हिस सेंटरमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्कोडाचा आंतरराष्ट्रीय यशस्वी प्रवास :
अलीकडेच स्कोडा ऑटो (Skoda Car) फोक्सवॅगन इंडिया ही कंपनी मुंबई पोर्ट अथॉरिटीने 2023-24 साठी ‘टॉप एक्सपोर्टर’ म्हणून घोषित केली आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या 6.75 लाखांहून अधिक गाड्या 70 देशांमध्ये निर्यात करण्यात आल्या असून, कंपनी भारतातील उत्पादन आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे.