बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझ्यासोबत झोप मी तुला काम देतो’; ‘या’ अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

मुंबई | अनेक अभिनेता-अभिनेत्री आपल्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील सुरू असलेल्या घडामोडी शेअर करत असतात.

अभिनेत्री किश्वर मर्चंडने छोट्या पडद्यावरून ‘कसोटी जिंदगी की’ या हिंदी मालिकेमध्ये काम केलं होतं. या कार्यक्रमातील तिच्या भूमिकेमुळे ती अनेकांच्या लक्षात राहिली आहे. तसेच तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयामुळे सर्वांच्या मनात तिच्या विषयी एक वेगळंच स्थान निर्माण झालं आहे. किश्वर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.  ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सतत आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून पोस्ट करत असते.

त्यामध्ये फोटो असतात, तर कधी व्हिडीओ. तसेच ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन त्यांच्याशी बोलते. अशातच तिने सगळ्यांसोबत विचित्र अनुभव शेअर केला आहे. किश्वर आपल्या अभिनयाच्या बळावर गेेले दोन दशक विविध मालिकांच्या माध्यमातू प्रेक्षकांचं मनोरंजन करतीये. एवढं करूनही तिला बॉलिवूडमध्ये काम का मिळालं नाही. याबाबत तिने एका मुलाखतीत बोलताना खुलासा केलाय.

तिनं अनेक ठिकाणी ऑडिशन्स दिले. अनुभव आणि अभिनयाच्या जोरावर तिची निवड देखील केली जात होती. मात्र तिच्या समोर एक विचित्र अट ठेवली जायची. जर तिनं निर्माते, दिग्दर्शक किंवा चित्रपटांमधील अभिनेत्यांसोबत शरीरसंबंध ठेवले किंवा त्यांच्या सोबत वन नाईट स्टँड केलं तर तिला हे काम मिळू शकेल, असं किश्वरने मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. तिने सांगितलेला तिचा अनुभव ऐकून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनामुळे मराठी गझलकाराला 90 वर्षांच्या आईसोबत रस्त्यावर राहण्याची वेळ!

हृदयद्रावक! 10 वर्षांनी पहिलं मूल झालं, 6 महिन्यांतच चिमुकलीला कोरोनानं गाठलं अन्…

‘…हा तर अजित पवारांचा दांभिकपणा’; चंद्रकांत पाटील आक्रमक

संकटाच्या काळात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत- अजित पवार

पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधानांना देण्यात आलेली वागणूक योग्य नाही- राजनाथ सिंग

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More