बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गांधी जयंतीदिवशी सोशल मीडियावर धार्मिक कट्टरतावाद्यांकडून नथूराम गोडसे जिंदाबादचा नारा!

नवी दिल्ली | देशभरासह जगात आज देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. गांधी जयंतीसोबतच देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींची जयंती देखील आज उत्साहात संपन्न होत आहे. पण, मागील दोन ते तीन वर्षांपासून सोशल मीडियावर गांधी जयंतीच्या दिवशी वेगळाच ट्रेंड चालवला जात आहे. महात्मा गांधीजींचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ #नथूराम_गोडसे_जिंदाबाद असा हॅशटॅग यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावर चालवला जात आहे.

ज्या महात्मा गांधीनी सत्याग्रह करत ब्रिटीशांविरूद्ध अहिंसक आणि शांततेचा मार्ग पत्कारला, पण आज त्यांच्याच जयंती दिवशी त्यांचा मारेकरी असलेल्या नथूराम गोडसेचं काही धार्मिक कट्टरतावाद्यांकडून उदात्तीकरण केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर होते. त्यावेळी  राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचं महत्व सांगितलं. तेव्हा देखील भारतात गोडसे जिंदाबाद म्हणून हॅशटॅग ट्रेंड झाला होता.

मागील दोन तीन वर्षांपासून गांधी जयंतीच्या दिवशी नथूराम गोडसेच्या समर्थनार्थ हॅशटॅग चालवला जात आहे. सोशल मीडियावर गांधी जयंतीच्या दिवशी त्यांचे विचार प्रसारित करण्यात येत असतात. ज्या धार्मिक कट्टरतावाद्यांकडून गोडसे समर्थनार्थ हॅशटॅग चालवला जात आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार गांधींमुळं देशाची फाळणी झाली. तसेच गांधी हे पाकिस्तान प्रेमी होते, असा दावा देखील त्यांच्याकडून केला जात असतो.

दरम्यान, आज सकाळपासूनच ट्विटरवर #नाथूराम_गोडसे_जिंदाबाद हा हॅशटॅग चालवला जात आहे. आज दुपारपर्यंत 1 लाखांहून अधिक जणांनी या हॅशटॅगला समर्थन दिलं आहे. याबरोबरच #गांधीजयंती, #नाथूराम_गोडसे_मुर्दाबाद असे हॅशटॅग चालवले जात आहेत. राज्यातील काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज ट्विट करत देशातील पहिला दहशतवादी नथूराम गोडसेचं समर्थन करणाऱ्या नेटकऱ्यांचे अकाऊंटस बंद करत सर्व ट्रेंड ब्लॉक करावेत अशी ट्विटरकडे मागणी केली आहे.

वाचा ट्विटस – 

 

 

पाहा व्हिडीओ – 

 

 

 

थोडक्यात बातम्या –

“मेहनत, खुप घाम गाळून जनतेचा विश्वास मिळवलाय, कोणत्याही पीआर एजन्सीमुळे नाही”

“ज्यांचे वडील मास्तर होते त्यांनी 1200 कोटींची संपत्ती जमवली, याची चौकशी का नाही?”

कडक सॅल्यूट! पतीच्या ‘त्या’ स्वप्नपूर्तीसाठी पत्नीने केलेल्या त्यागाचं तुम्हालाही वाटेल कौतुक

नितीन गडकरींकडून उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाचं तोंडभरून कौतुक म्हणाले…

नितीन गडकरींनी नगर जिल्ह्यासाठी केल्या ‘या’ तीन मोठ्या घोषणा!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More