राजकीय वर्तुळात शोक, ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचं निधन

SM Krishna passed away

SM Krishna | राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. माजी परराष्ट्र मंत्री, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते एसएम कृष्णा (SM Krishna) यांनी आज (10 डिसेंबर) अखेरचा श्वास घेतला. बंगळुरू येथील निवासस्थानी मध्यरात्री त्यांचं निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

या वृत्तानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि प्रियांक खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

एसएम कृष्णा यांची कारकीर्द

एसएम कृष्णा (SM Krishna) यांनी 11 ऑक्टोबर 1999 ते 20 में 2004 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला होता. तसेच, 6 डिसेंबर 2004 ते 8 मार्च 2008 दरम्यान ते महाराष्ट्राचे राज्यपाल देखील होते. 1962 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. मद्दूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून त्यांनी दणदणीत विजय मिळवला आणि इथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

पुढे 1968 मध्ये विद्यमान खासदाराचे निधन झाल्यावर त्यांनी मंड्या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. तर, 1971 आणि 1980 मध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली.

एसएम कृष्णा यांचे शिक्षण

राजकारणात आपल्या कामगिरीने छाप सोडणाऱ्या एसएम कृष्णा (SM Krishna) यांचा जन्म 1 में 1932 साली कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील मद्दुर तालुक्यातील सोमनहल्ली गावात झाला. त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण हत्तूर येथे घेतलं. तसेच त्यांनी म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी आणि युनिव्हर्सिटी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी पूर्ण केली. आज त्यांचा जीवनप्रवास थांबला. त्यांनी बंगळुरू येथे अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, गेल्या वर्षी एसएम कृष्णा यांना भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी सन्मान, पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी 2017 मध्ये कॉँग्रेस पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

News Title –  SM Krishna passed away

महत्त्वाच्या बातम्या-

“लाडक्या तायांनो, आता रस्त्यावर येणाऱ्या प्रज्वल आणि ब्रिजभूषणपासून स्वतःचं रक्षण…”; किरण माने यांची पोस्ट

महायुतीत कुणाला लागणार मंत्रीपदाची लॉटरी?, संभाव्य यादी समोर

मुंबई हादरली! कुर्ल्यात मृत्यूतांडव, भरधाव बेस्टने समोर दिसेल त्याला चिरडलं, नेमकं काय घडलं?

आज वृषभसह ‘या’ राशींना मिळणार शुभवार्ता, धनलाभाचेही संकेत!

खळबळजनक! पुण्यात भाजप आमदाराच्या मामाचं भर चौकातून अपहरण

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .