Smartphone Addiction | सध्याच्या काळात स्मार्टफोनचे (Smartphone) वेड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच लागले आहे. कोरोना काळात (Corona Pandemic) ऑनलाइन शिक्षणामुळे (Online Education) तर अनेक शाळकरी मुलांच्या हातात पहिल्यांदाच स्मार्टफोन आले. अल्पवयीन मुला-मुलींमध्ये स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पण ही मुले स्मार्टफोनचा वापर कशासाठी करतात? याबद्दलचा एक महत्त्वपूर्ण अहवाल समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ग्रामीण भागातील (Rural Area) बहुसंख्य मुले स्मार्टफोनचा वापर मनोरंजनासाठी (Entertainment) करत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तर, याउलट मुली मात्र फॅक्ट सर्च (Fact Search) करण्यासाठी म्हणजेच शिक्षणासाठी (Education) फोनचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. (Smartphone Addiction )
2024 च्या ASER सर्वेक्षणानुसार (Annual Status of Education Report), घरी स्मार्टफोन असलेल्यांपैकी बहुतांश मुलांनी स्मार्टफोनचा वापर व्हिडिओ शेअर करणे आणि यूट्यूब (YouTube) पाहणे अशा मनोरंजक गोष्टींसाठी केला. तर मुलींनी माहिती मिळवण्यासाठी फोनचा वापर केल्याचे दिसून आले. या अहवालातून मुला-मुलींच्या स्मार्टफोन वापराबाबतची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.
मुला-मुलींमध्ये स्मार्टफोन अॅक्सेसमध्ये तफावत
ASER च्या अहवालानुसार, 14 ते 16 वर्षे वयोगटातील विद्यार्थी असलेल्या 94.2% कुटुंबांकडे स्मार्टफोन होते. परंतु, या कुटुंबातील फक्त 65.5% मुलींनाच फोनचा अॅक्सेस होता. तर, 74.1% मुलांना घरातील फोनचा अॅक्सेस होता. म्हणजेच, मुलींपेक्षा मुलांना स्मार्टफोनचा अॅक्सेस मिळण्याचे प्रमाण जास्त आहे.
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 22.6% मुलांकडे आणि 15.5% मुलींकडे स्वतःचा स्मार्टफोन होता. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, मुलांच्या तुलनेत कमी मुलींकडे स्वतःचा स्मार्टफोन आहे. ही बाब चिंताजनक असून, मुलींना तंत्रज्ञानाच्या बाबतीत समान संधी मिळणे आवश्यक आहे. (Smartphone Addiction )
मुलांचा मनोरंजनासाठी तर मुलींचा अभ्यासासाठी वापर
सर्वेक्षणातून समोर आलेली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, मुले आणि मुली स्मार्टफोनचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी करत आहेत. 14 ते 16 वर्षे वयोगटातील 72.7% मुले सोशल मीडियासाठी (Social Media) फोनचा वापर करत होती. तर 63.3% मुले अभ्यासासाठी फोन वापरत होती.
मुलींच्या तुलनेत मुले अभ्यासाठी कमी आणि मनोरंजनासाठी अधिक फोनचा वापर करत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. 75.1% मुले आणि 70% मुली फोनचा वापर मनोरंजनासाठी करत होते. तर, अभ्यासाच्या बाबतीत 65.1% मुली फोनचा वापर अभ्यासाठी किंवा फॅक्ट सर्च करण्यासाठी करत असल्याचं दिसून आलं. मुलांच्या बाबतीत ही आकडेवारी 61.6% इतकी आहे. यावरून हे स्पष्ट होते की, मुली शिक्षणासाठी स्मार्टफोनचा वापर अधिक गांभीर्याने करत आहेत. (Smartphone Addiction )
Title : Smartphone Addiction Among Children Rural Area Boys Use For Entertainment Girls For Study