अहमदनगर | प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई अहमदनगरला पोहचणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी देसाईंना आव्हान दिलं आहे.
कोण तृप्ती देसाई, माझ्या नगर जिल्ह्यात येणार. माझा तिला निरोप आहे की बाई तुम्ही लवकर माझ्या गावचा रस्ता धरा. मी तुमची आतुरतेने वाट बघतेय. तुमच्या स्वागताची तयारी मी नगरमध्ये करुन ठेवली आहे, असं एकेरी उल्लेख करत स्मिता आष्टेकरांनी देसाईंना आव्हान दिलंय.
तृप्ती देसाई, तुम्ही नगर शहरात पाय ठेऊन दाखवाच, असं एकेरी शब्दात आव्हान दिलं आहे. मात्र शिवसेनेचे नगराध्यक्ष दिलीप सातपुते यांनी स्मिता आष्टेकरांचा शिवसेनेशी काहीही संबध नसल्याचं पत्रक काढून स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, आम्ही कोणाच्याही धमक्यांना घाबरत नाही. आम्ही अहमदनगरमध्ये येणारच. दुपारी 1 वाजता पोहचणार आहोत, असं तृप्ती देसाईंनी आष्टेकरांच्या आव्हानानंतर स्पष्ट केलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
इंदुरीकरांनी 25 वर्षात अनेक चुकीच्या चालीरीती बंद केल्या- बाळासाहेब थोरात
“इंदुरीकरांच्या सांगण्यावरुन मला अनेकांनी धमक्या दिल्या”
महत्वाच्या बातम्या-
तृप्ती देसाई तक्रार दाखल करण्यासाठी आज नगरमध्ये जाणार!
बारावीची परीक्षा आजपासून सुरु; राज्यभरातून 15 लाख विद्यार्थ्यी भविष्य आजमावणार
“एसआयटी चौकशीसाठी कायदेविषयक सल्ला घेणार”
Comments are closed.