बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी सरकारमुळेच मुंबई तुंबली अन् हिंदमाता येथे पाणी साचलंय त्याला स्मृती इराणी जबाबदार”

मुंबई | मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी मुंबई महानगरपालिकेवर सडकून टीका केली होती. आता शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारमुळे मुंबई तुंबली, असा दावा केला आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

केंद्र सरकारच्या दिरंगाईमुळेच मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलं. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरु झाल्यानंतर हिंदमाता, माटुंगा, सायन आणि दादर भागात पाणी साचत आहे. हिंदमाता येथे पाणी साचण्यासाठी भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जबाबदार आहेत, असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

तीन महिन्यांपासून हिंदमाता येथील अंडरग्राऊंड ड्रेनेज टनलची परवानगी मागितली जात होती. मात्र ही परवानगी उशीरा आल्याने हे काम होऊ शकलं नाही. परिणामी हिंदमाता परिसरात पाणी साचत असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला.

दरम्यान, मुंबई आणि उपनगराच्या परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आज पहाटेपासूनच मुंबईत जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र गेल्या काही तासांमध्ये ढगांचा गडगडाट आणि पावसाचा जोर वाढलाय. मुंबईत पावसानं जोर धरला असून पुढील तीन तास अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

थोडक्यात बातम्या- 

चिंता वाढली! ‘या’ जिल्ह्यात एका दिवसात तब्बल 24 कोरोनाबाधितांचा मृत्यू

भाजपमधील कोणालाही उत्तर देणं मी रास्त समजत नाही- खासदार संभाजीराजे

पुढील तीन तास मुंबईसाठी धोक्याचे; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

विद्यार्थ्यांच्या पुर्नपरीक्षेची विनंती विद्यापीठाने फेटाळली, तब्बल 9 हजार विद्यार्थी होणार नापास

प्रशांत किशोर यांची भाजप विरोधात मोहिम?; प्रशांत किशोर-शरद पवार भेटीवर राष्ट्रवादीचा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More