बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या लोकांना पंतप्रधानांच्या गाडीपर्यंत कोणी पोहचवलं?’, स्मृती इराणींचे काँग्रेसवर गंभीर आरोप

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा होणार होती. मात्र, नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने मोदींना सभा रद्द करावी लागली आहे. आंदोलकांनी मोदींचा ताफा अडवल्याने नरेंद्र मोदी 15 ते 20 मिनिटं उड्डाणपूलावरच अडकले होते. त्यामुळे भाजप नेते संतप्त झाल्याचं पाहयला मिळालं होतं. आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनीही या प्रकरणावरून पंजाब सरकार व काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

“भारताच्या इतिहासात आज पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खुनी इरादे अयशसस्वी ठरले. काँग्रेसमधील जे लोक मोदींचा द्वेष करतात, ते आज देशांच्या पंतप्रधानांना त्यांच्या सुरक्षेला कशाप्रकारे भंग करता येईल. यासाठी प्रयत्नशील होते”, असा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे. त्यांनी हा प्रकार समोर येताचं पत्रकार परिषद घेतली होती.

काँग्रेसला मोदींचा तिरस्कार आहे, हिशोब भारताशी आणि भारताच्या पंतप्रधानांशी करू नका. पंतप्रधानांच्या ताफ्याला जेव्हा अडवण्यात आले. ज्या लोकांनी पंतप्रधानांनी सुरक्षा भंग केली. त्या लोकांना पंतप्रधानांच्या गाडीपर्यंत त्या ठिकाणापर्यंत कोणी आणि कसं पोहचवलं? असा प्रश्न स्मृती इरांनी यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, आंदोलकांनी ताफा अडवल्याने मोदींना फ्लायओव्हरवरचं 15 ते 20 मिनीटं फ्लायओव्हरवरचं अडकून थांबावं लागलं. त्यामुळे पंतप्रधानांनी सभा रद्द करत विमानतळावर माघारी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, सुरक्षेतीत त्रुटीबाबत गृह मंत्रालायने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.

थोडक्यात बातम्या-

“… मी जिवंत पोहचू शकलो, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा”

धक्कादायक! संजय राऊतांच्या घरी कोरोनाचा शिरकाव, चार जणांना कोरोनाची लागण

पुढील चार दिवस जोरदार पाऊस; ‘या’ भागात अलर्ट जारी

मोठी बातमी! राज्यातील सर्व महाविद्यालय ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद!

‘या’ कारणामुळे सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर करण्यात आला दफनविधी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More