नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून देशात केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येत आहे. विरोधकांवर सुडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे, असा आरोप अनेक नेत्यांनी केला आहे. त्यातच आता नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून काँग्रेस नेते राहुल गांधींची चौकशी करण्यात येत आहे. राहुल गांधींच्या ईडी चौकशीमुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसने 90 कोटींचे कर्ज माफ केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
तपास यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी काँग्रेसशासित राज्यातील वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. काँग्रेसकडून उघडपणे तपास एजन्सीवर दबाव आणला जात आहे. हेच काँग्रेस पक्षाचे धोरण आहे का?,असा सवाल स्मृती इराणींनी केला आहे. 1930च्या दशकामध्ये असोसिएट जनरल लिमिटेड(AJL) नावाची कंपनी स्थापन करण्यात आली होती. या कंपनीचे काम वृत्तपत्र प्रकाशित करणे हे आहे, असं स्मृती इराणी म्हणाल्या आहेत.
सदर कंपनीचे पाच हजार भागधारक होते. या वृत्तपत्रासाठी स्वातंत्र्य सैनिकांची हमी निश्चित करण्यात आली होती. मात्र, वृत्तपत्राचा भागभांडवल एका कुटुंबाला देण्यात आलं. कंपनीने 2008 मध्ये स्वत:वर 90 हजार कोटींचे कर्ज घेतले होते. तसेच आता कंपनीने प्रॉपर्टीच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच 2010 साली यंग इंडिया नावाची कंपनी 5 लाख रूपये घेऊन स्थापन झाली. त्यामध्ये राहुल गांधी संचालक म्हणून सामील झाले होते, अशी माहिती स्मृती इराणींनी दिली.
दरम्यान, यंग इंडिया कंपनीमध्ये राहुल गांधींचा 75 टक्के हिस्सा असून बाकीचा हिस्सा त्यांची आई सोनिया गांधी आणि इतर काही लोकांकडे होता. त्यानंतर एजेएलचे 9 कोटी शेअर्स यंग इंडिया कंपनीला देण्यात आले. एजेएल कंपनीचे 99 टक्के शेअर्स यंग इंडिया कंपनीला मिळाले आहेत, असं स्मृती इराणींनी म्हटलं आहे. त्यातच काँग्रेस पक्ष एजेएल कंंपनीला 90 कोटींचे कर्ज देऊन माफ करते, हा कोणता प्रकार आहे, असा सवाल स्मृती इराणी यांनी उपस्थित केला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘…तर मला आणि भाजपला मैदानात उतरावं लागेल’, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! अपक्ष आमदार सदाभाऊ खोत यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
“राज्यसभा निवडणुकीत संजय राऊतांनी आमदारांना बंदूक दाखवून धमकी दिली”
“राखी सावंतने माझा फायदा घेतला, तिने माझं शोषण केलं”
“राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त होईल”
Comments are closed.