बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेस सर्वात भ्रष्टाचारी पक्ष आहे, तुम्ही भाजपला मत द्या- स्मृती इराणी

नवी दिल्ली | येत्या काही महिन्यांवर पाच राज्यातील विधानसभा निवडणुका आल्या आहेत. सर्व पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. प्रचारसभांना सुरूवात झाली असून आपल्या पुर्ण ताकदीनिशी पक्ष मैदानात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर आसामधील सभेत बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर खोचक टीका केली आहेे. आसाम विधानसभा निवडणूकीत भाजपकडून उमेदवारी दिलेल्या रमानी तंती यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी स्मृति इराणी बोलत होत्या.

काँग्रेस सर्वांत भ्रष्ट पक्ष आहे. केंद्रातील आणि राज्यातील कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर भाजपलाच  मत द्या, असं आवाहन स्मृती इराणी यांनी  सभेला संबोधित करताना केलं आहे.तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अनेक योजना तयार केल्या आहेत, ज्याचा जनेतेला पुर्ण लाभ घेता येणार असल्याचं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

आसाममध्ये अनेक मोठे काँग्रेस नेते होऊन गेले. त्यातील पंतप्रधानही झाले. मात्र राज्याचा विकास, गरिबांचं कल्याण मात्र काही झालं नाही. फक्त पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात आसाममध्ये एम्स उभे राहिलं असल्याचं म्हणत स्मृती इराणी म्हणाल्या.

दरम्यान, काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं बदरुद्दीन अजमल यांच्या पक्षाशी युती करण्यापासून पक्षाला थांबवलं होतं. मात्र त्या ज्येष्ठ नेत्याचं निधन झाल्यावर लगेचच काँग्रेसने अजमल यांच्या पक्षाशी युती केल्याचा आरोपही इराणी यांनी आपल्या भाषणात केला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

ब्रेकिंग! दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसच्या कोचला भीषण आग 

मनोरंजन क्षेत्रात कोरोनाची दहशत, बॉलिवूडचे ‘हे’ दोन मोठे कलाकार कोरोनाच्या जाळ्यात!

खुशखबर! फक्त 1.11 लाखात घरी न्या किया सेल्टाॅस कार

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मंत्रालयातील ‘या’ विभागांमध्ये चालणार दोन शिफ्टमध्ये काम

बकरीसमोर पाऊट करणं पडलं महागात, बकरीने केलं असं काही की…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More