बार परवाना वादावरून स्मृती इराणी आक्रमक, काँग्रेसविरोधात उचललं ‘हे’ मोठं पाऊल
नवी दिल्ली | भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani) यांची मुलगी गोव्यात अवैधरित्या बार चालविते त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केंद्रीय मंत्री मंडळातून त्यांची हाकलपट्टी करावी, अशा स्वरुपाची मागणीे काँग्रेसच्या प्रसार माध्यमाचे आणि प्रचारप्रमुख पवन खेडा (Pawan Khera) यांनी केली होती. त्यावर स्मृती इराणी भलत्याच संतापल्या होत्या. त्यांनी काँग्रेस नेते माझ्या मुलीच्या चारित्र्यावर हल्ला करत आहेत, असे आरोप केले होते.
हे आरोप स्मृती इराणी यांच्या मुलीने आणि तिच्या वकीलांनी फेटाळले होते. आता स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे नेते पवन खेरा (Pawan Khera), जयराम रमेश (Jairam Ramesh) यांना नोटीसा बजावल्या आहेत व माफी मागण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी तसे न केल्यास, पुढील लढाई न्यायालयात लढण्यास तयार रहा असा इशारा दिला आहे. स्मृती इराणी यांची मुलगी चालवत असलेल्या बारचा परवाना एका मृत व्यक्तिच्या नावावर असल्याचे उघडकीस आल्यावर गोंधळ उडाला आणि प्रकार समोर आला होता.
यावर भाष्य करताना स्मृती इराणी म्हणाल्या, माझी मुलगी कोणताही बार किंवा रेस्टॉरंट चालवत नसून ती 18 वर्षांची आहे आणि प्रथम वर्षात शिकत आहे. ती कोणतेही हॉटेल चालवत नाही. तिच्या चारित्र्यावर काँग्रेसने शिंतोडे उडवू नये. त्यांनी यानंतर राहुल गांधीना (Rahul Gandhi) आव्हान दिलं. त्यांनी आगामी निवडणूका अमेठीतून (Amethi Constituency) लढवून दाखवाव्यात, त्यांना मी दुसऱ्यांदा पराभूत करुन दाखवेन, असा दावा त्यांनी केला.
गोव्याचे अबकारी आयुक्त (Excise Commissioner) नारायण एस गाड (Narayan S. Gad) यांनी स्मृती इराणी यांच्या मुलीला जोइश इराणी (Joish Irani) हीला कारणे दाखवा (Show Cause) नोटीस पाठविली होती. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. स्मृती इराणी यांच्या मुलीने सिली सोप्स कॅफे अॅंड बारच्या 2022 – 23 च्या नुतनीकरणासाठी सादर कागदपत्रांत घोळ घालून अवैध आणि खोट्या कागदांचा वापर केल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. या खटल्याची सुनावणी 29 जुलैला होणार आहे.
थोडक्यात बातम्या –
सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेल तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त, वाचा ताजे दर
‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पहिला प्रोमो आला समोर
15व्या राष्ट्रपती म्हणून दौपदी मुर्मूंनी घेतली शपथ, सर्वोच्चपदी झाल्या विराजमान
‘त्या’ भाषणावरून निलेश राणेंची शरद पवारांवर टीका, फोटो शेअर करत केला भांडाफोड
‘पक्ष पळवला आता वडील पळवत आहात, तुम्ही बंडखोर नव्हे दरोडेखोर’; उद्धव ठाकरे आक्रमक
Comments are closed.