देश

राहुल गांधी देश तोडण्याची भाषा करत आहेत- स्मृती इराणी

नवी दिल्ली | राहुल गांधी देश तोडण्याची भाषा करत आहेत. दिल्लीत शेतकरी आंदोलनात हिंसेचं रुप आल्यानंतर अनेक पोलीस, मीडियाकर्मी जखमी झाले. मात्र त्यांच्याप्रती गांधींनी एक सहानुभूतीचा शब्द वापरला नाही, अशी टीका भाजप नेत्या स्मृती इराणी केली आहे.

राहुल गांधी यांनी दिल्ली हिंसाचाराच्या मुद्द्यावरून केंद्र सराकरवर टीका केली. या टीकेला स्मृती इराणी यांनी प्रत्युत्तर दिलंय.

राहुल गांधी देश तोडण्याची भाषा केली आहे. राहुल गांधी यांनी म्हटलंय की, 26 जानेवारीला जो हिंसा दिल्लीत बघायला मिळाली तसाच हिंसा देशातील इतर भागांमध्ये जनता बघेल. मी देशाला विनंती करते, राहुल गांधींच्या या इच्छेला आपण सर्व मिळून अपयशी ठरवू, असं स्मृती इराणी म्हणाल्या.

राहुल गांधी हिंसा पसरवण्यासाठी कशाप्रकारे योजना केली आहे, याची आम्हाला माहिती आहे, असं स्मृती इराणी यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

महाविद्यालये अजून सुरू का नाहीत?; भगतसिंह कोश्यारींचा सरकारला सवाल

“संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा”

“फक्त अयोध्येतच का जाता, हिंदू धर्मात चारधाम आहेत, तिकडंही जा”

अभिनेत्री कंगणा राणावत दिसणार इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत!

60 वर्षांपासून गुहेत वास्तव्य; राम मंदिरासाठी दान केलेली रक्कम ऐकाल तर हैराण व्हाल!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या