बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अवघ्या 30 वर्षाच्या तरुणीचा ‘टीम नाना पटोले’मध्ये समावेश, पाहा कोण आहे ती?

मुंबई | महाराष्ट्रात नाना पटोले यांच्या रुपाने नवा प्रदेशाध्यक्ष दिल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस कात टाकत असल्याचं दिसून आलं होतं, मात्र नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली नव्हती. आता अखेर पाच महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ‘टीम नाना पटोले’ची घोषणा करण्यात आली आहे. रात्री उशिरा यासंदर्भात घोषणा करण्यात आली. यामध्ये जुन्या नावांसह काही नव्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे. तब्बल 220 जणांची नावं या कार्यकारिणीत आहेत.

अवघ्या 30 वर्षांच्या तरुणीला या कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं आहे. स्नेहल जगताप असं त्यांचं नाव आहे, त्या माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या आहेत. माणिक जगताप यांचं निधन झालं आहे, त्यामुळे त्यांच्या मुलीला कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं. कार्यकारिणीत त्या सर्वात तरुण आहेत.

दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनाही कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे, त्यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजीव सातव यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले आहे. काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी ते एक म्हणून ओळखले जात होते तसेच गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय अशी देखील त्यांची ओळख होती.

दरम्यान, काल रात्री उशिरा नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या नव्या कार्यकारिणीत 18 उपाध्यक्ष, 1 खजिनदार, 65 सरचिटणीस, 104 चिटणीस आणि 6 प्रवक्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी खलबतं… अखेर पुणे काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची निवड

धोका वाढतोय! मुंबईत आजही कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, वाजा आजची आकडेवारी

राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, वाचा आजची आकडेवारी

‘भारताने पाकिस्तानसोबत….’; तालिबान्यांचा काश्मीरबाबत भारताला ‘हा’ सल्ला

काबूल विमानतळावरील पाणी बॉटल आणि जेवणाची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More