पुणे महाराष्ट्र

पुण्यातील स्नेहल काळभोर अवघ्या 21 व्या वर्षी झाली सरपंच!

दौड | राज्यात सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडणूका पार पडल्या असून आता सरपंचपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. दौंड तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अवघ्या 21 वर्षाची असलेल्या स्नेहल काळभोरची निवड करण्यात आली आहे.

21 व्या वर्षी स्नेहल काळभोर सरपंचपदी निवडून आली आहे. स्नेहल संजय काळभोर ही सध्या MCA च्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत आहे. सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत स्नेहलची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

वयाच्या 21 वर्षी स्नेहल सरपंच झाल्यामुळे काळभोर कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. निवडीनंतर स्नेहल काळभोरची गावातून घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली आहे. कमी वयाची सदस्य म्हणून स्नेहल काळभोर खडकी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी पहिल्यांदा निवडून आली होती. आता स्नेहलच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली आहे.

आपल्या शिक्षणाचा आपल्या गावाच्या विकासासाठी वापर करुन अधिकाधिक कामे मार्गी लावणार असल्याचं स्नेहलने म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

तरुणीचा लग्नाला नकार, ‘प्रपोझ डे’ दिवशी तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल

आम्ही कुणाला घाबरत नाही, जे बोलायचं ते छातीठोकपणे बोलतो- चंद्रकांत पाटील

“नरेंद्र मोदींनी नटसम्राट व्हावं, लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही”

अवैधरित्या दारु विकण्यासाठी घेतला देवाचा आधार; घडलेला प्रकार पाहून पोलिसही हैराण

धक्कादायक! हॅार्न वाजवल्याचा राग आल्याने चालकाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या