Top News देश

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, जोशीमठ धरण फुटल्याने अनेकजण वाहुन गेल्याची भिती

उत्तराखंड |  उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळल्याची घटना घडली आहे. हिमकडा कोसळल्याने जोशीमठ धरण फुटल्याने अनेकजण वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यातच या धरणाचा कडाही तुटल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले असून अनेक घरे आणि माणसे वाहून गेले आहेत.

तपोवन परिसरातील रेणी गावात वीज प्रकल्पाजवळ अचानक झालेल्या हिमस्खलनानंतर धौलीगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे.

दरम्यान, चामोली जिल्हाधिकाऱ्यांनी धौलीगंगा नदीच्या काठी वसलेल्या गावातील लोकांना बाहेर काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हा दंडाधिकारी व पोलिस अधीक्षक घटनास्थळी रवाना झाले आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

राज्यातील भाजप नेत्यांना ‘जनाची नाही, तरी मनाची ठेवावी’- रोहित पवार

छातीत दुखत असल्यामुळे तो डॅाक्टरांकडे गेला; रिपोर्ट पाहून डॅाक्टरांनाही बसला धक्का

लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांनी केलेल्या ट्विटवर राज ठाकरेंचं नेमकं बोट; पाहा व्हिडीओ

‘आम्ही शरजीलसोबत आहोत’; एल्गार परिषदेच्या आयोजकांचा उस्मानीला पाठिंबा

धक्कादायक! 27 वर्षीय नौदल जवानाचं अपहरण करून जिवंत जाळलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या