बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजनांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव | भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीष महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी धमकावल्याचं आरोप केल्याचं समजत आहे.

जळगावमधील या संस्थेता ताबा मिळण्यासाठी जानेवारी 2018 मध्ये भोईटे गटाकडून एडवोकेट विजय पाटील यांना पुण्यात बोलवून धमकावल्या प्रकरणी वकील विजय पाटील यांनी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तीन वर्षांपूर्वी पुण्यात घडलेल्या या घटनेचा अखेर निंभोरा इथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्यामुळे आता यावर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, या प्रकरणात गिरीश महाजन यांच्यासह भोईटे गटातील सदस्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकायला हवा- उद्धव ठाकरे

‘अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं’; चंद्रकांत पाटलांची पवारांवर टीका

मुंबईच्या रस्त्यांवर फिरतोय सांताक्लॉज; भेट म्हणून देतो मास्क आणि सॅनिटायझर

समितीतील सदस्यांना बोलण्याचा अधिकार नाही का?; राहुल गांधींचा सवाल

…अन् दिल्ली विधानसभेत केजरीवाल यांनी रागात कृषी कायद्याची प्रत फाडली!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More