बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील तरूणाला मध्यस्थी करणं पडलं महागात, भांडण मिटवली म्हणून तलवारीने केले सपासप वार

पुणे | पुण्यातील गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुन्ह्यांच्या शहरांमध्ये पुण्याचं देखील नाव येतं. अशातच खडक मनपा येथे अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपुर्वी झालेल्या एका वादातून 6 जणांच्या टोळक्याने एका तरुणावर तलवारीने सपासपा वार केले आहेत. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

या घटनेतील मुख्य आरोपीचं नाव योगेश गाटे असून ज्या तरुणावर वार करण्यात आले त्याचं नाव श्रीनिवास रागिर असं आहे. श्रीनिवास याचं वय केवळ 20 वर्ष आहे. आठ दिवसांपुर्वी श्रीनिवासचा मित्र आणि आरोपी या दोघांमध्ये वाद झाला होता. यादरम्यान श्रीनिवासने मध्यस्ती करुन ही भांडण मिटवली होती. याच गोष्टीचा राग आरोपीला होता. या रागातून आरोपीने श्रीनिवासवर वार करण्याचं ठरवलं.

सोमवारी योगेश गाटे त्याच्या मित्रांसोबत श्रीनिवसजवळ गेला. त्या दिवशी आमच्या भांडणामध्ये कशाला पडलास असं म्हणून थांब आता तुझी विकेट टाकतो, असं म्हणत योगशने वाद घातला. त्यानंतर त्याने शर्टच्या मागे लपवलेली तलवार काढली. तसेच योगेश शिवीगाळ देखील करु लागला. याचवेळी योगेशने त्याच्या मित्रांसोबत मिळून श्रीनिवासला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या संपुर्ण प्रकरणात श्रीनिवासच्या अंगठ्याजवळ जखम झाली आहे. तसेच वार केल्यानंतर आरोपी संबंधित ठिकाणावरुन फरार झाले. या संपुर्ण घटनेची माहिती श्रीनिवासने पोलिसांना दिली असून योगेश सोबत आणखी 5 जणांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

कोंबड्या अंडी देत नाही म्हणून पोल्ट्री मालकाची पोलिसात धाव; प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

कोरोनामुळे ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर काळाच्या पडद्याआड

मंत्री राजेंद्र शिंगणेंचा धक्कादायक खुलासा; “रेमडेसिवीरचा साठा महाराष्ट्राला मिळणार होता पण…”

“बात निकली है तो दूर तक जायेगी”; रोहिणी खडसेंना भाजप नेत्याचा इशारा

खुनाचा बदला खुनानेच घेण्याचा प्रयत्न, पुण्यातील थरारक घटनेनं परिसरात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More