बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

….म्हणून अभिनेत्री पायल रोहतगीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहमदाबाद | राजकीय घडामोडींपासून बॉलिवूडमधील घराणेशाहीपर्यंत रोखठोकपणे आपली मतं मांडणारी अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. पायलवर सोसायटीच्या चेअरमनला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोसायटीची सदस्य नसतानाही पायल 20 जून रोजी सोसायटीच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत आली होती. मात्र, तिला बैठकीत बोलून दिलं नाही. त्यामुळे संतापलेल्या पायलने सभेत शिवीगाळ करत सदस्यांसोबत वाद घातला.

सोसायटीच्या आवारात जी मुलं खेळताना दिसतील त्यांचे हात पाय तोडेन असं देखील ती म्हणाली. असे आरोप तिच्यावर करण्यात आले आहेत. या आरोपांखाली अहमदाबाद पोलिसांनी तिला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

दरम्यान, यापूर्वीही एकदा पायलला अटक झालेली आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांच्याविषयीचा एक व्हिडीओ पायलनं तयार केला होता. या व्हिडीओमध्ये तिनं नेहरुंवर खोटे आरोप केले होते. या प्रकरणातून अद्याप तिची पूर्णत: सुटका झालेली नाही.

थोडक्यात बातम्या – 

जवानानं धावत्या रेल्वेतून कोसळणाऱ्या प्रवाशाचे वाचवले प्राण, रेल्वेमंत्र्यांकडून कौतुकांचा वर्षाव

“करावं तसं भरावं, त्यामुळे राष्ट्रवादीने ईडीच्या कारवाईवर राजकारण करू नये”

“केंद्र सरकार आपल्या कर्तव्यात चुकल्यामुळेच ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलं”

रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा मैदानात! अमेरिकन पाॅप स्टार ब्रिटनी स्पीअर्सच्या स्वातंत्र्यची मागणी

कोरोनाच्या घातक डेल्टा प्लस विषाणूने या जिल्ह्यात पहिला बळी; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More