बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सोशल मीडियाला रामराम

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच चर्चेत असलेली पहायला मिळते. कोणत्या न कोणत्या कारणावरुन ती चर्चेत असते. अशातच आता ती आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. शिल्पा शेट्टीनं सोशल मीडियाला रामराम करत मोठा निर्णय घेतला आहे.

शिल्पा शेट्टीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सोशल मीडियाला रामराम करत असल्याचं सांगितलं आहे. काळा फोटो शेअर करत शिल्पानं सोशल मीडिया सोडत असल्याचा निर्णय घेत असल्याचं म्हटलं आहे.

फक्त एकच-एक गोष्टीचा कंटाळा आला आहे. सर्व काही सारखे दिसत आहे… जोपर्यंत मला नवीन कोणता अवतार मिळत नाही तोपर्यंत सोशल मीडियापासून दूर जात आहे, असं कॅप्शनही शिल्पानं लिहिलं आहे.

दरम्यान, शिल्पा नेहमीच तिच्या फिटनेसमुळे आणि आयकाॅनिक स्टाईलमुळे चर्चेत असते. तिचे चाहतेही भरपूर आहे. आता तिच्या या मोठ्या निर्णयामुळे चाहतेही नाराज झाले आहेत.

 

थोडक्यात बातम्या –  

मंत्रालयासमोर कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न, ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर

Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

सोनाली कुलकर्णी पुन्हा अडकली लग्नबंधनात, फोटो शेअर करत म्हणाली…

उत्तर कोरियात दोन वर्षांनी कोरोना रूग्ण आढळताच किम जोंगने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

मोठी बातमी! संभाजीराजेंकडून ‘स्वराज्य’ संघटनेची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More