बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून तर आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण झाली नाही ना?’; भाजप नेत्याचा सवाल

मुंबई | मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते रवी राजा यांनी केला आहे. याचाच धागा पकडत भाजप नेते आणि आणदार अतुल भातखळकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना टोला हाणला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मालमत्ता कर वसुलीत 100 कोटींची तफावत असल्याचा काँग्रेसने ‘घरचा आहेर’ दिला असल्यामुळे तर पर्यावरण मंत्र्यांना कोविडची लागण झाली नाही ना?, असा उपरोधिक सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे. दक्षिण विभागातील वरळी, परळ या भागात अनेक ठिकाणी मिलच्या मोक्याच्या व व्यावसायिक जागा आहेत. या मिल मालकांकडून मालमत्ता करापोटी महापालिकेला कोट्यवधी रुपये येणं आहे.

अधिकारी मात्र मालमत्ता कर आकारणी करताना त्यांची देयके संबंधित जागा मालकांना पाठवताना त्यांच्या जागेचे आकारमान आणि त्यांचे मूल्य कमी दाखवतात. त्यामुळे त्यांचा मालमत्ता कर हा काही कोटींऐवजी काही लाखांत आकारला जातो. याचा मोठा आर्थिक फटका पालिकेला बसत असून संबंधित पालिका अधिकारी गब्बर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर रवी राजा यांनी घोटाळ्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, वरळी भागात मालमत्ता कर वसुलीत 100 कोटींचा, तर संपूर्ण मुंबईत 700 ते 800 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचा दावा रवी राजा यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुंबई आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“देवेंद्र फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत”

देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला- नाना पटोले

कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या 10 शहरांपैकी 9 शहरं महाराष्ट्रातली, केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये!

“एका व्यक्तीनं जरी त्रास दिल्याचं दाखवून दिलं तर उमेदवारी अर्ज भरणार नाही”

संजय राऊतांच्या घरी मेजवानी, भाजप नेत्यांनाही जेवणाचं निमंत्रण!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More