बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून मीराबाई चानूच्या भेटीनंतर सलमान खान झाला ट्रोल!

मुंबई | भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानूनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिलं पदक मिळवून दिलं आहे. रौप्य पदकाची कमाई करत देशाचं पदकांचं खातं उघडलं आहे. मीराचं हे मेडल भारतासाठी पहिलं मेडल ठरल्यानं चहूकडून मीराबाई चानूवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. यानंतर अभिनेता सलमान खाननं मीराबाई चानूची भेट घेतली. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर याभेटीनंतर चर्चांना उधाण आलं आहे.

मुलाखतीदरम्यान अनेकवेळा मीराबाई चानूनं ती सलमान खानची मोठी चाहती असल्याचं म्हटलं आहे. नुकतंच सलमान खाननं मीराबाई चानूची भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच क्षणातच व्हायरल झाला आहे. फोटो व्हायरल होताच सलमान खान नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.

सलमान खाननं हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान खानच्या गळ्यामध्ये एक मणिपुरी स्कार्फ दिसून येत आहे. यामुळे त्याला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. गिफ्ट म्हणून दिल्या गेलेल्या स्कार्फवर काळविटाची प्रिंट छापलेली दिसतेय. मग काय, लोकांनी भाईजानच्या या स्कार्फवर ते चित्र बघताच मागच्या गोष्टींशी संबंध लावत त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे..

दरम्यान, हा फोटो शेअर करत सलमानंनं रौप्य पदक विजेती मीराबाई चानू, तुम्हाला शुभेच्छा एक सुंदर भेट झाली. तुम्हाला खूप शुभेच्छा!, असं म्हटलं आहे. सध्या सोशल मीडियावर या फोटोवर आणि फोटोच्या शालीवर जोरदार प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या –

“आपण भाग्यवान म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सवर आपला स्वतःचा फोटो आहे”

सेक्स व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ; भाजपचा बडा नेता अडचणीत!

मायग्रेनने ग्रस्त असलेल्या लोकांनी ‘हे’ खाऊ नये!

पीएफ खातेदारांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे जमा होणार

“गंगा नदीच्या पाण्यात कोरोना व्हायरस टीकू शकत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More