बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर पुन्हा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करणार’; अमित शहांचा पाकिस्तानला इशारा

पणजी | पाकिस्तानमधून भारतात होणारी घुसखोरीसाठी मागील काही वर्षात सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. पाकिस्तानमधून होणारी घुसखोरी थांबली नाही आणि काश्मीरमधील अशाच प्रकारे सामान्य नागरिकांवर हल्ले होत राहिले तर पुन्हा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करणार आहे, असा कडक इशारा दिला आहे.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आणि मनोहर पर्रिकर संरक्षणमंत्री असताना पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील कित्येक वर्षापासून आक्रमणधारी सीमा पार करत इथं येत होते. वेगवेगळ्या प्रकारच्या घटना इथं घडत होत्या. तसेच दहशतवादी कारवाया करत होते आणि दिल्लीतील सरकारकडून निवेदनाशिवाय काहीही येत नव्हतं, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

जेव्हा पुंछमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि आपले जवान मारले गेले. काश्मीरच्या सीमेवर हल्ला झाला आणि त्यात आपले जवान मारले गेले. त्यांना जिवंत जाळण्यात आलं, पण नंतर आपण सर्जिकल स्ट्राईक करत भारतानं जगाला दाखवून दिलं आहे, की भारताच्या सीमाभागात छेडछाडी करणं किती महागात पडू शकतं, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमित शहा हे गोव्याच्या धोरबंदोरा येथे राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गोवा इथल्या पायाभरणी कार्यक्रमाच्या दरम्यान बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची आठवणींना उजाळा देखील दिला.

थोडक्यात बातम्या –

“मी रांगत फिरेन, हवं तर लोळत फिरेन, हवं तर गडगडत जाईन, कोणाला काय प्राॅब्लेम?”

‘बास झालं राजकारण, हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं…’; उदयनराजेंचं खुलं आव्हान

“चित्रा वाघ कोणत्या मनोवृत्तीच्या आहेत हे त्यांनी दाखवून दिलंय”

‘शरद पवारांना पंतप्रधान पद मिळालं नाही म्हणून…’; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

…म्हणून मी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी दिली; हर्षवर्धन पाटलांचा मोठा खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More