बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून भारतीय संघात भुवनेश्वरला स्थान मिळालं नाही, समोर आलं मोठं कारण!

मुंबई | भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’ आणि इंग्लंडच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळालेलं नाही. त्याचा संघात समावेश न केल्याने विविध चर्चा सुरु होत्या. त्याचा संघात समावेश का होऊ शकला नाही, यावरुन बरंच मंथन सुरु होतं. अखेर त्याचं संघात समावेश न होण्याचं कारण समोर आलं आहे.

भुवनेश्वर कुमारचा संघात समावेश न होण्यापाठीमागचं पहिलं कारण आहे, त्याने कसोटी क्रिकेट खेळून बराच कालावधी लोटला आहे. भुवीने गेल्या काही महिन्यात कसोटी क्रिकेट खेळलेलं नाही. शेवटी कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये बाॅलर कितीही अव्वल दर्जाचा असला तरी त्याला फॉरमॅटची प्रॅक्टिस असणं गरजेचं असतं.

सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे, निवड समितीला असं वाटतंय की भुवनेश्वर कुमार कसोटी क्रिकेटसाठी सध्या फिट नाहीय. विशेष करुन लांबलचक दौऱ्यासाठी तो अजूनही पूर्णपणे फिट नाही. दुसरीकडे भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जे सध्या चांगल्या फॉर्मात आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांनी चांगलं प्रदर्शन केलंय. अशा स्कॉडला पुन्हा इंग्लंड दौऱ्यात संधी द्यायला हवी.

दरम्यान, भुवनेश्वर कुमारला आयपीएलच्या 13 व्या मोसमात चेन्नई सपर किंग्जविरोधातल्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून त्याने माघार घेतली होती. भुवीने सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीमधून पुनरागमन केलं होतं ज्यानंतर त्याला इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित ओव्हर्सच्या फॉरमॅटमध्ये निवडलं गेलं. त्याने इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यात 6 विकेट् घेतल्या तर 5 टी-20 सामन्यात चार विकेट्स घेतल्या.

थोडक्यात बातम्या – 

आमदार अण्णा बनसोडेंवर गोळीबार प्रकरणात CCTV फुटेज व्हायरल ; पाहा व्हिडीओ

अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलगा सिद्धार्थ आणि पीएसह 10 जणांवर गुन्हा दाखल

मुंबईतील सक्रिय रूग्णसंख्या घटली; बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं, वाचा आकडेवारी

काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाकडून डाॅक्टरला मारहाण ; पाहा व्हिडीओ

‘प्राण जाये पर शान ना जाये’; कोविड सेंटरमध्ये कोरोनाग्रस्तांना असा होतोय तंबाखू आणि गुटख्याचा पुरवठा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More