देश

…तर भाजप म्हणजे ‘जेल गाडी’ आणि ‘लिंच पुजारी’- काँग्रेस

नवी दिल्ली | भाजप म्हणजे ‘जेल गाडी’ आणि ‘लिंच पुजारी’ आहे, अशी खोचक टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे नेते शकील अहमद यांनी आपल्या ट्विटरवरून असं ट्वीट केलं आहे. 

काँग्रेसचे काही नेते जामिनावर बाहेर अाले आहेत, त्यामुळे काँग्रेस म्हणजे ‘बेल गाडी’ आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. हे असं असेल तर भाजपला ‘जेल गाडी’च म्हटलं पाहिजे, असं अहमद यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपचे कमीत कमी दोन अध्यक्ष कोर्टाच्या आदेशानंतर तुरुंगात गेले होते. मात्र ‘जेल’मध्ये जाण्यापेक्षा ‘बेल’वर बाहेर राहणं कधीही चांगलंच,’ असंही त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या–

-पोलीस गणवेशावर टिळा, गंडा-दोरे नकोत; आयुक्तांचे आदेश

-पी. चिदंबरम यांच्या घरात चोरी; चोरट्यांनी हिरे लांबवले

-साक्षात प्रभू रामचंद्र आले तरीही बलात्कार थांबवता येणार नाहीत- भाजप आमदार

-संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील अश्वाचा मृत्यू!

-अमित शहा पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना शिकवणार चाणक्य नीती!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या