बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपने राज ठाकरेंच्या नादी लागू नये, पुण्याचं महापौर पद आम्हालाच पाहिजे”

पुणे | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला इशारा दिला आहे. भाजपनं पुण्यात राज ठाकरेंच्या नादी लागू नये, असं म्हणत भाजपला मनसेमुळं नुकसान होऊ शकतं, असं सल्ला आठवलेंनी भाजपला दिला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपला आरपीआय असताना मनसेची गरज नाही. मनसेमुळं भाजपचं नुकसान होऊ शकतं. त्यांचा परप्रांतीय मुद्दा बघून भाजपने राज ठाकरेंच्या नादी लागू नये. आम्ही भाजपचा नाद सोडला, तर ते आमचा नाद सोडणार नाहीत, असा सूचक इशारा देखील आठवलेंनी भाजपला दिला आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकीत आमचा पक्ष भाजपसोबत राहणार आहे. पुण्यात महापौरपद आम्हाला मिळालं पाहिजे. तसेच मुंबईमध्ये उपमहापौरपद मिळालं पाहिजे, असं आठवलेंनी म्हटलं आहे. पुण्यात आम्हाला 15 ते 20 आणि मुंबईमध्ये 30 ते 35 जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आठवले पुढं पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की आम्हाला राज्य सरकार पाडण्याची काही गरज नाही. सर्व यंत्रणा देशाच्या ताब्यात असल्या तरी मोदी तशा सूचना आम्हाला देत नाहीत. शरद पवारांचा मी आदर करतो, पण त्यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही. तसेच केंद्र सरकार धाडी टाकायला लावत नाही, असं देखील आठवलेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

दोघात तिसरा आता सगळं विसरा! महिलेला चुंबन देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या

राज्यात साथीच्या रोगांचा कहर! ‘या’ जिल्ह्यात आढळले तब्बल 882 रूग्ण

उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! प्रियंका गांधींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अन् चक्क डेव्हिड वार्नरने केला रोहित शर्मावर चोरीचा आरोप!

‘जाऊ तिथं खाऊ आणि चोर चोर मावसभाऊ’; सदाभाऊ कडाडले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More