बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…त्यामुळं CM नाही तर PM बदला’; काँग्रेसचा भाजपवर निशाणा

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे. त्यासाठी भाजपने गुजरातमध्ये तयारी देखील सुरू केली आहे. विजय रूपाणी यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करत भाजपने गुजरातसमोर नवा पाटीदार समाजाचा चेहरा समोर आणला आहे. त्यावरून आता काँग्रेसने भाजपवर निशाणा साधलाय.

भाजप देशातील सर्व ठिकाणी आणि सर्व राज्यांमध्ये अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे भाजपाने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवलं आहे. मुख्यमंत्री बदलल्यानं पंतप्रधानांचे अपयश झाकले जाणार नाही, अशी खोचक टीका काँग्रेसने भाजपवर केली आहे. ट्विटच्या माध्यामातून काँग्रेसने भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. #CM_नहीं_PM_बदलो, हा हँशटॅग देखील काँग्रेस ट्विटरवर राबवताना दिसत आहे.

कोरोना, पेट्रोल डिझेल इंधनवाढीला भाजप सरकार जबाबदार आहे. देशातील बेरोजगारी, भूकमारी आणि घटत्या अर्थव्यवस्थेला देखील मोदी सरकार जबाबदार आहे. मात्र, इंजिनामध्ये बिघाड आहे आणि डब्बे बदलले जात आहेत, अशी टीका देखील काँग्रेसने केली आहे.

दरम्यान, अनेक भाजपशासित राज्यात अनेक मुख्यमंत्र्यांची सुट्टी होताना दिसत आहे. मागील 6 महिन्यात भाजपने 5 राज्यातील मुख्यमंत्री बदलले आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता भाजपने हे पाऊल उचल्याचं कळतंय. ज्या राज्यात भाजप मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा चांगल्या नाहीत, त्यांची सुट्टी होत असल्याचं दिसून येतंय. याच मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या- 

अफगाणिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली??? ;रशियाने तालिबान्यांना दिला ‘हा’ गंभीर इशारा

अवघ्या 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, अमरावतीत चार दिवसात दुसरा प्रकार

पावसाचं रौद्ररूप! कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री; भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय

‘शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं’; बाळासाहेब थोरातांचं पवारांना आवाहन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More