बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर त्या देशांना कर्माची फळे भोगावी लागतील’; जागतिक मंचावरून पंतप्रधान मोदींचा इशारा

न्युयॉर्क | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेच्या 76 व्या सत्राला संबोधित केलं आहे. पंतप्रधानांनी या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सत्राला संबोधताना विविध विषयांवर आपलं मत मांडलं आहे. मोदींनी पाकिस्तान आणि चीनवर नाव न घेता कान उघडणी केली आहे. जे देश आज दहशतवादाला खतपाणी घालत आहेत, त्या देेशांना त्याची फळे भोगावी लागणार आहेत, असा इशारा मोदींनी विरोधी राष्ट्रांना दिला आहे.

दहशतवादाचा उपयोग हा कुठल्याही देशाच्या हिताचा नाही. अफगाणिस्तानवर बोलताना मोदींनी पाकवर टीका केली आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर हा दहशतवादी कारवायांसाठी होणार नाही याची सर्व राष्ट्रांनी खातरजमा करायला पाहिजे. तसेच हे सर्व राष्ट्रांचे कर्तव्य आहे, असं मोदींनी दहशतवादावर बोलताना म्हणाले आहेत.

समुद्र ही सर्व विश्वाची संपदा आहे, त्या संपदेचं संरक्षण आणि जतन करणं हे सर्व राष्ट्रांचं कर्तव्य आहे. समुद्राचा वापर हा विस्तारवादासाठी आणि घुसखोरीसाठी होणार नाही याची प्रत्येक राष्ट्रांनी खबरदारी घ्यायला हवी, म्हणत मोदींनी चीनला समुद्रातील सीमरेषेवरून सुनावलं आहे.

दरम्यान, समुद्र ही आंतरराष्ट्रीय व्यापाराची जीवनवाहिनी असून विस्तारवादाच्या राक्षसी आकंक्षांपासून दूर ठेवायला हवं, असं मोदींनी मत व्यक्त केलं आहे. समुद्रात घुसखोरी करणाऱ्या राष्ट्रांना जागतिक स्तरावरून धडा शिकवायला पाहिजे. तसेच कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद आणि घुसखोरी खपवून घेणार नाही, असा इशारा चीनसह पाकिस्तानला मोदींनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या –

भारताचं ‘ते’ जुनं स्वप्न होणार लवकरच पूर्ण! जो बायडन यांच्याकडून भारताचं तोंडभरून कौतूक

भाजपा युवा मोर्चाचे राजेश टोपेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

दिल्ली पुन्हा अव्वल! भेदक गोलंदाजीने राजस्थानला 33 धावांनी धूळ चारली

‘या’ तीन राज्यांना ‘गुलाब’ चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्राला देखील अलर्ट जारी

नरेंद्र मोदींच्या संपत्तीत ‘इतक्या’ लाखांची वाढ; वाचा नक्की किती आहे संपत्ती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More