बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून कोरोना मृतांच्या कुटुंबियांना आम्ही 4 लाख देऊ शकत नाही- केंद्र सरकार

नवी दिल्ली | देशभरातील अनेक कोरोना योद्धे गेल्या वर्षभरापासून कोरोनापासून आपल्याला वाचवण्यासाठी लढत आहेत. या लढाईत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. कोरोनानं बळी ठरलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. त्यावर केंद्रानं आपली भूमिका मांडली आहे.

कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. या मागणीवर केंद्र सरकारने न्यायालयात आपली भूमिका मांडली. कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसान भरपाई देऊ शकत नसल्याचं केंद्र ससरकारनं रविवारी न्यायालयात स्पष्ट केलं.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर केंद्राने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यात केवळ भूकंप, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बळी ठरलेल्यांनाच मदत करण्याची तरतूद आहे. जर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये नुकसान भरपाई द्यायची म्हटलं, तर एसडीआरएफ फंडातील सर्वच रक्कम संपून जाईल. आणि एकूण खर्चही वाढू शकतो, असं केंद्रानं न्यायालयाला सांगितलं आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे, 20 जून 2021 पर्यंत देशात तीन लाख 86 हजार 713 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना मृताची संख्या वाढण्याची शक्यताही आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सर्वांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाखांची मदत करणं अशक्य असल्याचं केंद्र सरकारनं न्यायालयात सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

खुशखबर! आज चांदी 2 हजारांनी तर सोनं 600 रुपयांनी उतरलं; वाचा ताजे दर

“देशाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही”

संतापजनक! मुलाकडून जन्मदात्या आई-वडिलांना बेदम मारहाण, आईचा मृत्यू अन्….

“शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून आमची बदनामी”

“अयोध्या घोटाळ्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना हिंदुद्रोही ठरवणं म्हणजे विकृती”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More