मुंबई | उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. हा फोटो तसा गमतीदार आहे. मात्र चिंता वाढवणारा देखील आहे.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये एक तरूण लोकलमध्ये झोपलेला दिसतोय. कोरोना पासून बचाव करण्यासाठी त्याने मास्क तर लावला आहे, मात्र तो नाका-तोंडावर नाही तर त्याने तो मास्क डोळ्यावर लावलाय. आनंद महिंद्रांनी हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, जेव्हा तुम्ही मुंबईत कोरोना वाढत असल्याच्या कारणाचा शोध सुरू करता तेव्हा (हा जुगाड कौतुक करण्यासारखा नाही), असं आनंद महिंद्रांनी म्हटलंय.
आनंद महिंद्रा सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. ते त्यांच्या पोस्टमधून अनेकदा भारतीयांमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या कौशल्याचं कौतुक करतात. त्यामुळे देशात कुठेही कानाकोपऱ्यात जुगाड करणारा रिक्षा चालक, नोकरदार, किंवा सर्वमान्य माणूस यांच्या आयुष्यातील अनोख्या गोष्टी समोर येत असतात.
दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करोना रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसात मुंबईत एक हजारावर नवीन रूग्णांची भर पडली असल्याने करोनाची भीती वाढत चालली आहे. त्यामुळे सध्या राज्य सरकारकडून मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम अधिक कडक केले आहेत. मात्र असं असतानाही लोकांमध्ये जागृकतेचा अभाव असल्याचं दिसत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना इशारा दिला आहे. जर येत्या काही दिवसात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो, असं ते म्हणालेत.
When you start looking for reasons behind the recent rise in Covid cases in Mumbai…(This is one jugaad that doesn’t deserve any applause.) pic.twitter.com/3FbyNR7ClM
— anand mahindra (@anandmahindra) February 26, 2021
थोडक्यात बातम्या –
धक्कादायक! भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल
महिलेची संजय राऊतांविरोधात हायकोर्टात धाव; केले ‘हे’ गंभीर आरोप
‘माझा जुना मुर्ख बॉयफ्रेन्ड अजून…’; कंगणाची हृतिक रोशनवर बोचरी टीका
‘मुझे वो दिन आज भी याद है जब…’; युसूफने शेअर केला भावूक व्हिडिओ
खळबळजनक! पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Comments are closed.