बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून त्यांनी थेट ‘कोविन अॅप’च केलं हॅक; धक्कादायक प्रकार उघडकीस!

औरंगाबाद | कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही. त्यामुळे नागरिकांना कोरोना नियमांचं पालन करण्यास वारंवार सांगितलं जात आहे. कोरोना संकटापासून वाचण्याचं लसीकरण हे एकमेव शस्त्र असल्यानं लसीकरणावर भर दिला जात आहे. अशातच आता लसीकरण प्रमाणपत्र मिळवण्यासाठी थेट कोविन अॅपच हॅक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

औरंगाबादमधील आरेफ काॅलनी आरोग्य केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय. 16 जणांनी कोविन अॅप हॅक करुन लस न घेता लसीकरण प्रमाणपत्र तयार केलं आहे. आता हा प्रकार उघडकीस आला असून याविषयी औरंगाबाद महापालिकेनं बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कोविन अॅपवर औरंगाबादमधील महापालिकेचं लाॅगईन आयडी हॅक केलं आहे. सर्व 55 जणांचे लसीकरण झाल्यानंतर डाटा ऑपरेटर शकील खान यांनी सगळ्या नोंदी बरोबर झाल्या आहेत का, हे पाहण्यासाठी अॅप तपासलं तेव्हा त्यांना या केंद्रावर 71 जणांच्या नाेंदी दिसून आल्या. त्यांनंतर 16 जणांनी लसीकरण प्रमाणपत्र तयार केल्याचा हा प्रकार समोर आला आहे.

दरम्यान, तांत्रिक विभागाचे शकील यांनी तात्काळ लसीकरण बंद केलं आणि तेथील आरोग्य अधिकाऱ्याशी संपर्क साधला. पोलीस या प्रकरणाची आणखी तपासणी करत असून अद्याप आरोपी सापडले नाहीत.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक

पावसाने मोडला 12 वर्षांचा रेकाॅर्ड! 24 तासात तब्बल ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद

12 पैकी ‘या’ 4 नावांवर राज्यपालांना आक्षेप???; मुख्यमंत्री-राज्यपाल भेटीनंतर चर्चांना उधाण

हातातोंडाशी आलेला घास पावसाने नेला! मराठवाड्यात पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान

रात्री घरात शिरला बिबट्या अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More