बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून CSKच्या ‘या’ खेळाडूनं आयपीएल सुरू असतानाच घेतला निवृत्तीचा निर्णय!

नवी दिल्ली | आयपीएल 2021चं दुसरं पर्व सध्या चालू आहे. आयपीएलच्या गुणतालिकेमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएलचं पर्व भर रंगात असतानाच आता सीएसकेच्या संघातील एका खेळाडूनं कसोटी क्रिकेमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

सीएसकेच्या संघाकडून खेळणारा मोईन अली हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. इंग्लडच्या या खेळाडूने आतापर्यंत अनेक सामने गाजवले आहेत. अशातच मोईन अली आता कसोटी सामने खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच मोईनने याबद्दल इंग्लडच्या संघाचा कर्णधार जो रूट आणि प्रशिक्षक क्रिस सिल्वरवूड यांना याबद्दल माहिती दिली आहे. मोईन लवकरच याबद्दल अधिकृत घोषणा करेल.

मोईनने आतापर्यंत 64 कसोटी सामने खेळले आहेत. पुढील महिन्यात T20 विश्वचषक आणि अशेस मालिका सुरू होत आहे. या मालिकांच्या संभाव्य सदस्यांच्या यादीमध्ये इंग्लंडच्या संघाकडून मोईन अलीचं नाव होतं. परंतु आता अशेस मालिकेसाठी मोईनचा विचार केला जाणार नाही.

दरम्यान, या मालिकेसाठी मोईन अलीला फार काळ आपल्या कुटुंबियांपासून लांब राहावं लागणार होतं. यामुळे तो द्विधा अवस्थेत होता. यामुळेच मोईनने कसोटीमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या

तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची आज ‘भारत बंद’ची हाक!

SBI सारख्या चार ते पाच मोठ्या बॅंकांची देशाला गरज- निर्मला सीतारामन

मनी हाईस्टच्या ‘बेला चाओ’ गाण्याच्या देशी व्हर्जनचा सोशल मीडियावर तुफान राडा, पाहा व्हिडीओ

पुढील 3 तासात राज्यातील ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

“…नाहीतर ओवैसींना भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचं अंगवस्त्र म्हणून पाहिलं जाईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More