बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून मी मुख्यमंत्र्यांना ते पत्रं लिहिलं’; प्रताप सरनाईकांचा खुलासा

मुंबई | शिवसेनेचे नेते आणि खासदार प्रताप सरनाईक यांच्यावर काही दिवसांपूर्वी ईडीने कारवाई केली होती. त्याचबरोबर त्यांच्या घरावर ईडीकडून छापेही टाकण्यात आले होते. हे सगळं सुरू असताना प्रताप सरनाईक गायब असल्याच्या अनेक चर्चा राज्यात सुरू झाल्या होत्या. मात्र आज त्यांनी या चर्च्यांना पूर्णविराम दिला आहे.

आजपासून राज्याचं पावसाळी आधिवेशन सुरू झालं. आधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात प्रताप सरनाईक यांनी हजेरी लावेली. त्यावेळी त्यांनी या देशामध्ये माझ्यावर कोणतेही एफआयआर दाखल झालेले नाहीत. तसेच माझ्या विरोधात कोणी वक्तव्यही केलेलं नसून मी कुठेही गायब झालेलो नसल्याचं सरनाईकांनी सांगितलं आहे. तसेच माझ्यावर झालेल्या आरोपांना सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिलं असल्याचंही त्यांनी म्हटलं.

प्रताप सरनाईक यांनी आज सभागृहात पाहून अनेक विरोधी पक्षनेत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. लोणावळ्यात ईडी टाकलेल्या छाप्यांविषयी बोलताना माझ्या हृदयावर शस्त्रक्रिया, पत्नीचा कॅन्सर, त्यात कुटुंबावर कोरोना एवढी संकट कुटुंबावर आली होती. त्यामुळे परिस्थिती पाहता मी काही दिवस शांत राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं सरनाईकांनी सांगितलं. मी काही विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहून चोक्सी नाही. की ईडीने कारवाई केली म्हणून गायब होणा, पळून जाणार असंही त्यांनी म्हटलं आहे.

आपण महाविकास आघाडीवर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तरे दिली अशा वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी ठामपणे उभं राहायला हवं होतं. पण तसं झालं नाही. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्रं दिलं. त्यामुळे मी चुकीचं काही केलं असं वाटत नाही, असं सरनाईक यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“भागवतांनी हिंदू- मुस्लीम ऐक्यावर बोलणं म्हणजे RSSने सरड्याप्रमाणे रंग बदलणं”

‘सगळं कामकाज बाजूला ठेवा पण MPSC वर चर्चा घ्या’; फडणवीस आक्रमक

“170 आमदार असून काय उपयोग?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे”

“ओबीसींच्या इम्पिरीकल डेटाचा ठराव म्हणजे वेळकाढूपणाचं धोरण”

एमपीएसीच्या रिक्त जागांबाबत अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More