बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून ट्विटरवर चाईल्ड पॉर्नोग्राफीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

नवी दिल्ली | सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरनं मोठ्या प्रमाणात झालेल्या विरोधानंतर भारताचा चुकीचा नकाशा आपल्या पेजवरुन हटवला आहे. यातच आता ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष महेश्वरी यांच्याविरुद्ध भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दर्शवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता अजून एका प्रकरणात ट्विटरविरोधात दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाईल्ड पॉर्नोग्राफीविरोधात ट्विटरवर पॉक्सो कायद्यांतर्गत आणि नव्या आयटी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ट्विटरवर लहान मुलांच्या लैंगिक शोषणासंबंधी लिंक आणि केंटेन्ट टाकला असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ट्विटर इंक आणि ट्विटर कम्युनिकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड विरोधात तक्रार देण्यात आली आहे.

ट्विटर इंक आणि ट्विटर कम्युनिकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या दोन्हींची नावे गुन्हा दाखल करताना नमूद करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, मनिष महेश्वरी यांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी न्यायालयाने 5 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. विशेष म्हणजे ही याचिका उत्तर प्रदेश पोलिसांनीच पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

थोडक्यात बातम्या – 

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

‘डेल्टा प्लस’बाबत सध्याच्या क्षणाला चिंता करण्याची आवश्यकता नाही- राजेश टोपे

शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी, वाचा काय आहेत पक्षादेश?

“बार, पब, डिस्को चालतात मग गणेशोत्सव का नाही?”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More