नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलंय. देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. देशात कोरोनाचं सावट असताना सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही वाढत चाललं आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी समाज माध्यमांवर सतर्कता बाळगावी यासाठी सरकारकडूनही वेळोवेळी सूचना आणि इशारे देण्यात येतात.
सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं समाज माध्यमांसंदर्भात सूचना देण्यासाठी सुरु केलेल्या ‘सायबर दोस्त’ या ट्विटर हॅण्डलवरुन लस घेतल्यानंतर त्याचं प्रमाणपत्र कोणत्याही सोशल माध्यमांंवर शेअर करु नये, असं आवाहन केलं आहे.
देशात कोरोनाकाळात लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे ऑनलाइन व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारीचंही प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे. लसीकरण प्रमाणपत्रावर लस घेणाऱ्या व्यक्तीचं नाव, वय यासारखी बरीच खाजगी माहिती असते. या माहितीचा वापर करुन सायबर गुन्हेगार फसवणूक करु शकतात. हे प्रमाणपत्र भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान लस घेतल्याचा पुरावा म्हणून कामी येऊ शकतं. त्याचबरोबर काही ठिकाणावरुन हे डाऊनलोडही करण्यात येऊ शकतं. त्यामुळे खबरदारी म्हणून सरकारनं कोरोना लसीच्या प्रमाणपत्रासंदर्भात इशारा दिलाय.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे अनेकांनी घरातच बसून काम करण्यास प्राधान्य दिलं असून आजही अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करण्याकडे कल वाढला असल्यानं याच काळात सायबर गुन्हेगारीचा आलेख वाढू लागला आहे.
Beware of sharing #vaccination certificate on social media: pic.twitter.com/Tt9vJZj2YK
— Cyber Dost (@Cyberdost) May 25, 2021
थोडक्यात बातम्या –
‘उद्धव, मी तुझी शिक्षिका…’; उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटलांना शिकवलेल्या शिक्षिकेची आर्त हाक!
रक्षकच बनला भक्षक! पती कोरोनामुळे रुग्णालयात असल्याची संधी साधत पोलिसाने केला महीलेवर बलात्कार
“भाजपनेच मराठा आरक्षण दिलं आणि संभाजीराजेंना खासदारही केलं”
संतापजनक! वरातीसोबत आलेल्या तरुणाने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
‘या’ शिवसेना आमदाराची गाडी त्यांच्याच घरासमोर पेटवण्याचा प्रयत्न
Comments are closed.