बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…त्यामुळे शरद पवारांना बळीचा बकरा बनवू नका- रामदास आठवले

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रपतीपदाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे. यावरून अनेक नेत्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. शरद पवारांनी खुद्द राष्ट्रपती होणार नसल्याचं सागितलं असलं तरी त्यांच्या नावाची चर्चा दिल्लीत सुरू आहे. त्यात आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

विरोधक शरद पवारांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पुढे करत आहेत. पवार लढायला तयार असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असं सांगतानाच पवार या निवडणुकीत विरोधकांच्या ताकदीवर निवडून येणार नाहीत. त्यामुळं त्यांचा विरोधकांनी बळीचा बकरा करू नये, असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

आगामी पालिका निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढविली जाईल. मात्र, विधानसभा आमच्या चिन्हावर लढविण्याचा प्रयत्न आहे. भाजप व रिपब्लिकन पक्ष एकत्र असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता येणं अवघड आहे. भाजपच्या‌ सहकार्यानं रिपाइंला उपमहापौरपद मिळालं असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय.

दरम्यान, रामदास आठवले यांनी कोरोनाच्या सुरवातीच्या काळात गो कोरोना गो चा नारा दिला होता. त्यानंतर त्यांनी आता नवा नारा दिला आहे.  मी ‘गो कोरोना’चा नारा दिला होता. त्याचा परिणाम सर्वत्र दिसून आला. आता, ‘नो कोरोना नो कोरोना’चा नारा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येणार, पुन्हा भाजपचा मुख्यमंत्री होणार”

हर्षवर्धन पाटलांच्या चुलत भावाचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश!

“स्वप्नीलच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांना भेटायला जावं लागलं, हे निबर कातडीचं सरकार”

‘ही’ अभिनेत्री लवकरच करणार कमबॅक; दाऊदसोबतच्या संबंधांमुळे आली होती चर्चेत

संजय राठोडांच्या क्लीन चिटवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More