बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून जगभरातील फेसबुक सर्व्हर झालं होतं ठप्प; तब्बल एवढ्या हजार कोटींचं नुकसान

नवी दिल्ली | 4 ऑक्टोबर रोजी दुपारी अचानक जगभरातील फेसबुक, व्हाॅट्सअॅप, इन्स्टाग्राम ठप्प झालं होतं. सर्वत्र युझर्सचा गोंधळ सुरु होता. अशातच आता यामागील कारण समोर आलं आहे. व्हाॅट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर देखील फेसबुकचं स्वामित्व आहे. धक्कादायक बाब म्हणजे जगप्रसिद्ध फेसबुकचे सर्व्हर एक, दोन नव्हे तर तब्बल सात तास डाऊन झाले होते.

फेसबुकचे DNS अर्थात डोमेन नेम सिस्टीम फेल झाल्याने व्हाॅट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद झालं होतं. DNS कोणत्याही वेबसाईटला आयपी अॅड्रेसमध्ये ट्रान्सलेट करतो. यामुळे युझरला त्याला हव्या त्या पेजला पोचण्यास मदत होते. हे DNS फेल होण्यामागचं कारण फेसबुकचे BGP म्हणजेच बाॅर्डर गेटवे प्रोटोकाॅल आहे. डीएनएस, बीजीपी रुटच्या मदतीने आपलं काम करतो. मात्र बीजीपी फेल होण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सर्व्हर फेल झाल्यामुळे जगभरातील नागरिकांनाच नव्हे तर फेसबुक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देखील मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. सर्व्हर डाऊन झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे अॅक्सेस कार्ड देखील काम करणं बंद झालं होतं. सर्व्हर डाऊन झाल्याने तसेच कर्मचाऱ्यांचे देखील अॅक्सेस कार्ड काम करणं बंद झाल्याने फेसबुकने त्यांच्या कॅलिफोर्नियाच्या सँटा क्लारा डेटा सेंटरवर एक टीम पाठवली. बंद पडलेलं सर्व्हर मॅन्युअली रिसेट करण्यासाठी हे प्रयत्न सुरु होते. तिथंसुद्धा अॅक्सेस कार्ड काम करत नसल्याने कर्मचाऱ्यांना रुमचे लाॅक तोडून रुममध्ये जावं लागलं. यामुळे फेसबुकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी माईक स्करोपफेरनं ट्विट करत सर्वांची माफी मागितली.

दरम्यान, अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर फेसबुक सेवा पुन्हा सुरळीत सुरु झाली. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 3 वाजून 24 मिनिटांनी फेसबुक सुरु झाले. तर मध्यरात्री 4 वाजता व्हाॅट्सअॅपच्या सेवा सुरु झाल्या. या समस्येमुळे एकूण 596 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. तसेच इंटरनेटवरील ग्लोबल ऑब्झर्व्हरी ‘नेटब्लाॅक्स’च्या अंदाजानुसार जगाच्या अर्थव्यवस्थेला या समस्येमुळे तब्बल 1192.9 कोटींपेक्षा अधिक नुकसान झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

लखीमपूरच्या ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ आला समोर; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

परतीच्या पावसामुळे ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट; पुढचे 4 दिवस धोक्याचे

हाॅर्नची कटकट संपणार, नितीन गडकरींनी आणली ‘ही’ नवी योजना

”फक्त भाजप आमदारांच्या मतदारसंघातच लाॅकडाऊन लावलं जातं”

“शाहरूखच्या पुत्राच्या कृत्याचे ढोल बडवताना मीडिया मात्र…” राऊतांचा मीडियावर हल्लाबोल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More