बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून हार्दिक पांड्यानं भर मैदानात घातला साष्टांग दंडवत, पाहा गमतीदार व्हिडीओ

पुणे | भारत विरुद्ध इंग्लंड संघात काल तिसरा एकदिवसीय सामना झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडला 330 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंड संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या बेन स्टोक्सचा झेल हार्दिक पंड्याने सोडला होता. मात्र, नंतर शिखर धवनने त्याचा झेल घेतल्यानंतर हार्दिक पांड्याला भर मैदानात साष्टांग दंडवत घालताना पाहायला मिळाले.

इंग्लंडकडून सलामीला जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो उतरले होते. मात्र, रॉय पहिल्याच षटकात बाद झाला. त्यामुळे स्टोक्सला लवकर फलंदाजीसाठी यावे लागले. मात्र, 5 व्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर स्टोक्सने मोठा फटका मारला, या फटक्याने चेंडू लाँग ऑनला गेला. तिथे उभ्या असलेल्या हार्दिकच्या हातून हा चेंडू निसटला. त्यामुळे स्टोक्स 15 धावांवर बाद होता होता वाचला.

हार्दिकने जेव्हा स्टोक्सला झेल सोडला, तेव्हा मैदानात असलेले भारतीय खेळाडूंबरोबरच भारतीय ड्रेसिंगरुममध्ये बसलेल्या सदस्यांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आले. कारण स्टोक्स हा एक आक्रमक फलंदाज आहे. तसेच त्याने मागील सामन्यातच 99 धावांची खेळी केली होती.

दरम्यान, शेवटच्या षटकापर्यंत चाललेला हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला. इंग्लंडच्या सॅम करणने शेवटपर्यंत चिवट झुंज दिली. पण त्याला संघासाठी विजय खेचता आला नाही. तर भारताकडून शार्दुल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमारने चांगल्या गोलंदाजीचा मारा केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

थोडक्यात बातम्या – 

‘अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे…; महाराष्ट्राची वाट लावू नका’

पवार- शहा भेटीच्या चर्चेवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

महावितरणची थकबाकी हे भाजपचंच पाप आहे- नितीन राऊत

मोदींनी आदेश दिल्यास माझी ममतांच्या विरोधातही लढायची तयारी – मिथुन चक्रवर्ती

माजी IPS संजीव भट्ट यांच्या पत्नीची भावनिक साद, म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More