बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून मुलीला निर्वस्त्र करुन तिच्यासोबत अघोरी प्रकार, वर्ध्यातील घटनेनं महाराष्ट्रात खळबळ

वर्धा | वर्धा येथे एक संतापजनक कृत्य समोर आलं आहे. पैश्यांचा पाऊस पडेल या आशेवर तरुण मुलीचा मानसिक तसेच शारीरिक छळ करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुण मुलीची आईचा देखील या कृत्यामध्ये सहभागी होती. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

संबंधित तरुणीची आई एका दुकानात कामाला होती. तिथं ओळख झालेल्या ओळखीतून मुलीची पूजा करत पैशाचा पाऊस पाडणारा मांत्रिक असल्याचं एकानं तिला सांगितलं. त्यानंतर मुलीच्या छळाला सुरु करण्यात आली. युवतीला वर्ध्यासोबतच लगतच्या जिल्ह्यांतही नेण्यात आलं होतं. युवतीच्या शरीरात अतृप्त आत्मा सोडून हा पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष मांत्रिकाकडून दाखवण्यात आला.

अघोरी पूजा करून तब्बल 80 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचा दावा मांत्रिकाने केला होता. त्यासाठी युवतीला निर्वस्त्र करत तिच्यासोबच घृणास्पद प्रकार करण्यात आला. सातत्याने होणाऱ्या या छळाला कंटाळून पीडिता घरून निघून गेली होती.

दरम्यान, युवती हरवल्याची तक्रार दाखल असल्यामुळे तिचा शोध सुरु होता. यादरम्यान युवतीने रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन संपुर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर तिला सखी वन स्टॉप सेंटर येथे निवाऱ्यासाठी पाठविण्यात आलं आहे. आता याबाबत रामनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मंत्र्यांना आवरा”; भर बैठकीत देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

नागरिकांनो तयारी ठेवा!; मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसंदर्भात मांडली ‘ही’ महत्त्वाची भूमिका

महाराष्ट्रात संपूर्ण लॅाकडाऊन होणार?, आत्ताच बाहेर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती

अमृता फडणवीसांनी का टाकला हा फोटो?, जाणून घ्या गुपित

पुण्याला अजून थेट केंद्राची मदत नाहीच, महापौरांचा ‘तो’ दावा ठरला फोल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More