महाराष्ट्र मुंबई

‘सरकारनं तो निर्णय मागं घ्यावा’; अबू आझमींचं उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई | महाराष्ट्र सरकारनं यूरोप आणि मध्य पूर्व देशांतून येणाऱ्या प्रवाशांना पेड क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा पूनर्विचार करण्याची मागणी अबू आझमी यांनी केली आहे.

कोरोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असला तरी कोरोना रोखण्यासाठी हा मार्ग नाही, असं अबू आझमी यांनी स्पष्ट केलंय.

परदेशातून मुंबईच्या विमानतळांवर आल्यास पेड क्वारंटाईन करण्यात येणार आहे. यामुळे लोक देशातील दिल्ली, बेंगलोर, कोलकत्ता येथे विमानावरुन येऊन रेल्वे किंवा देशांतर्गत विमानसेवेद्वारे महाराष्ट्रात येतील. त्यांना क्वारंटाईटन कसं करणार हा प्रश्न अबू आझमींनी उपस्थित केला.

पेड क्वारंटाईन करण्याचा निर्णय त्या मजुरांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे सरकारनं पेड क्वारंटाईनचा निर्णय मागं घ्यावा, अशी विनंती अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा आणि त्यांच्या जागेवर…”

फेसबूक पोस्ट करत महिलेचा अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली…

मी परत जाईन, परत जाईन म्हणायला त्यांना कोणी बोलावलंही नव्हतं- अजित पवार

धक्कादायक! ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याचा धरणात बुडून मृत्यू

देशात भाजपची तानाशाही सुरू आहे, विरोधकांनी एकत्र यायला हवं- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या