बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी विधानसभा अध्यक्ष होण्यास तयार, पण शिवसेनेनं वनमंत्रिपद सोडू नये”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षपदावरून वाद होताना दिसत आहेत. विधानसभेचं अध्यक्षपद सध्या काँग्रेसच्या खात्यात जरी असलं तरी अद्याप काँग्रेसला अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा निर्णय घेता आला नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात या पदासाठी चुरस असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता हे अध्यक्षपद शिवसेनेकडे देण्यात येण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यावर आता भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तिन्ही पक्षांनी मला विधानसभा अध्यक्ष केल्यास मी होण्यास तयार असल्याचंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे . मात्र त्या बदल्यात शिवसेनेने आपल्याकडचं वन मंत्रिपद सोडू नये, असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या एकमतानं विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला मिळत असेल तरच शिवसेनेनं ते स्वीकारावं. आधीच शिवसेनेकडे महत्वाची खाती नाहीत त्यामुळे शिवसेनेने वनमंत्रिपद सोडू नये, असं भास्कर जाधव म्हणाले.

भास्कर जाधव जर अध्यक्ष झाले तर चांगल्या प्रकारे काम करतील, असं मत तिन्ही पक्षांचं मत झालं आहे. शिवसेनेनं आपल्या वाट्याचं वनमंत्रिपद देऊन अध्यक्षपद घेऊ नये, या मतावर मी ठाम असल्याचं देखील भास्कर जाधव यांनी म्हटलंय. कोणाला काय द्यावं, कोणाला कुठे बसवावं, हे तिन्ही पक्ष मिळून ठरवतात, असंही भास्कर जाधव म्हणाले.

दरम्यान, केवळ दोन दिवसांच्या या अधिवेशनात तालिका अध्यक्षपदी नियुक्त केलेल्या भास्कर जाधव यांनी अधिवेशन गाजवलं होतं. त्यांनी भाजपच्या 12 आमदारांची विकेट काढली. तर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बाचाबाचीमुळे ते अधिवेशनानंतर देखील चर्चेत आले होते.

थोडक्यात बातम्या-

टाटा ग्रूपच्या मालकीची टीसीएस कंपनी ‘इतक्या’ हजार फ्रेशर्सला देणार नोकरी!

नाना पटोलेंच्या खुलास्यानंतर फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी होणार; गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मी स्वत: बोलेन, पण ‘हे’ प्रकल्प वेगाने पूर्ण करा- उद्धव ठाकरे

मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार? पालकमंत्र्यांचं सूचक विधान

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More